अब्दुललाट येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे योग प्रशिक्षण शिबीर संपन्न.
अब्दुललाट:
पंचायत समिती शिक्षण विभाग शिरोळ व गीता परिवार जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अ.लाट येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी योग प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.यापूर्वी ही योग प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले असून आजच्या अंतिम टप्प्यात अब्दुललाट,नांदणी,अकिवाट व दत्तवाड या चार केंद्रांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी योग प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.यांमुळे संपूर्ण शिरोळ तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील प्रत्येकी एक शिक्षकांचे प्रशिक्षण झाल्याने १००% तालुका पूर्ण झाला.यासाठी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रीय प्रमुख,मुख्याध्यापक व अध्यापक -अध्यापिका यांचे सहकार्य लाभले.
शिक्षक निरोगी असतील तर साहजिकच मुलेही निरोगी राहतील.योगांमुळे शिक्षकांचे प्रॉब्लेम दूर होतील.योग ऑलिंपिकपर्यंत पोहोचला आहे. तो मुलांच्यापर्यंत पोहोचविणे हे कर्तव्य आहे.योगांमुळे ऑक्सीजनचा स्तर वाढतो. योगांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.म्हणून शिक्षकांच्यासाठी योग प्रशिक्षणाच्या माध्यमातून योगप्रसार करण्याच्या उद्देश्याने गट शिक्षणाधिकारी भारती कोळी यांनी हा उपक्रम राबविला.त्यासाठी गीता परिवार जयसिंगपूरच्या प्रमिला माहेश्वरी,श्रीधर बनसोडे,विशाल गोसावी,श्रेणिक पाटोळे यांचे सहकार्य लाभले.योगप्रशिक्षणात शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शाळांशाळामध्ये योग उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी व्यक्त केला.
अब्दुललाट येथील योग प्रशिक्षणाचे उद्घाटन प्राचार्य देवेंद्र कांबळे यांनी केले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक डी.ए. कांबळे,पर्यवेक्षक व्ही.टी. काटकर,केंद्र प्रमुख सलिम अत्तार,मुकेश कोळी यांचे बरोबरच,अध्यापक,अध्यापिका उपस्थित होते.
प्रास्ताविक एस.बी.गुरव यांनी केले तर दिलीप शिरढोणे यांनी आभार मानले.