Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

टाकळीवाडी येथील गणेश मूर्ती कर्नाटकात व महाराष्ट्रात प्रसिद्ध

दत्तवाड __


टाकळीवाडी ता. शिरोळ येथील श्री गणेश मूर्ती कर्नाटकातील चिकोडी तालुका, रायबाग तालुका ,व महाराष्ट्रातील शिरोळ तालुक्यात प्रसिद्ध आहेत.

   टाकळीवाडी मध्ये दीड फुटापर्यंत गणपती तयार केले जातात. तसेच अकरा फुटापर्यंत गणेश मूर्ती चे कलर काम केले जातात.

  यांचा लहानपणापासून चा हा व्यवसाय आहे. गेली 50 वर्षे हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे.


  अतिशय सुबक व अत्यंत सुंदर अशा मूर्ती बनवली जातात. सध्या काही दिवसात गणेश चतुर्थी येऊन ठेपलेली आहे.

  त्या दृष्टिकोनातून त्यांचे कार्य जोरात चालू आहे. अनेक मूर्तींना मागणी वाढत आहे. कुंभार समाजाचे कार्य आता सध्या वीस तास काम चालत आहे.

   कुंभार समाजाचा उदरनिर्वाह या गणेश मूर्तीवर चालतो. मूर्ती घडवण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात हे सुद्धा त्यांनी सांगितले. संपूर्ण कुंभार समाज लहान बालकापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत गणेश मूर्ती बनवण्यामध्ये सध्या व्यस्त आहेत.