Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

कुरुंदवाड शिक्षक पतसंस्थेने सभासदांच्या परिवाराला चालना दिली :खासदार धैर्यशील माने संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात सर्व विषयांना मंजुरी

शिरोळ : प्रतिनिधी :


शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. कुरुंदवाड या संस्थेने शिक्षकांच्या परिवाराला चालना दिली. सर्वसामान्य सभासदांच्या अडचणी दूर करण्याचे काम केले आहे.बहुजनांच्या उध्दारासाठी सुरु  झालेल्या संस्थेने आज नावलौकीक मिळवला आहे.या संस्थेच्या उभारणीत खा.बाळासाहेब माने यांचे योगदान लाभले आहे. माने घराण्याचे व संस्थेचे जवळचे संबंध आहेत. चांद्रयान मोहिमेतील शास्त्रज्ञही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये शिकलेले होते. शिक्षण व्यवस्थेमध्ये कोल्हापूर पॅटर्न राज्यात पोहोचलेला आहे. याचा अभिमान वाटतो. असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले

    येथील टारे क्लब हाऊस येथे शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कुरुंदवाड या संस्थेची 39 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने हे बोलत होते

      माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की सार्वजनिक जीवनातही शिक्षक चांगली नितीमत्ता ठेवतात.याचा अभिमान वाटतो. शिक्षण तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले. पण आज शिक्षणावरील खर्च कमी होत आहे.याची खंत वाटते. यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे.

        माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, संस्थेने सभासदांचा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न केला याचा अभिमान वाटतो. मयत सभासद कल्याण निधी योजनाही गौरवास्पद आहे. मागील संचालक मंडळाचेही योगदान मोलाची आहे.

      दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव म्हणाले, शिरोळच्या विकासात शिक्षकांचे मोठे योगदान आहे. संस्था शासनाचेही कार्य करीत आहे. मयत विमा योजना,डिव्हिडंड, भेटवस्तू अशा अनेक योजना राहुल सभासदांचे हित पाहिले जात आहे.

      गटशिक्षणाधिकारी भारती कोळी म्हणाल्या, शिरोळ तालुका गुणवत्ता विकास उपक्रमांसाठीही संस्थेने योगदान द्यावे.

      अध्यक्षपदावरून बोलताना नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

     यावेळी सेवानिवृत्त शिक्षक, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. याप्रसंगी दलित मित्र डॉ अशोकराव माने, भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज यादव, शिक्षक नेते बजरंग काळे, भगवान कोळी,अनिल ओमासे,रविकुमार पाटील, सुनिल एडके,सुरेश पाटील, विठठ्ल भाट,महंमद मुल्ला, दिलीप पाटील,मेहबूब मुजावर, राजाराम सुतार,रमजान पाथरवट,डी.के.पाटील,दिलीप शिरढोणे यांचेसह संचालक व सभासद उपस्थित होते.प्रास्ताविक व स्वागत चेअरमन परशराम चव्हाण केले त्यांनी आपल्या मनोवतामध्ये संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला तर आभार व्हाईस.चेअरमन सुनिल कोळी यांनी मानले.

         दुसऱ्या सत्रात वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. विषयपत्रिकेचे वाचन संस्थेचे व्यवस्थापक विलास कोळी यांनी केले. सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली.यावेळी विषय पत्रके वरील विषयांच्या चर्चेमध्ये रविकुमार पाटील,सुरेश पाटील, विठ्ठल भाट,सुनिल एडके,कुमार सिदनाळे,प्रकाश खोत,दिलीप शिरढोणे,कृष्णात आंबी,राम माने,संदीप कांबळे,अशोक निकम,सतिश यळगुडे,आशिष लठ्ठे,महंमद मुल्ला,दशरथ खोत, चंद्रकांत कोरे,विलास वासुदेव, काळेल,बाजीराव खंदारे यांनी भाग घेतला. संस्थेचे सभासद व कर्मचारी आणि हितचिंतन मोठ्या संख्येने उपस्थित होते