Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

फास्टफूड च्या जमान्यात घरची भाजी-भाकर श्रेष्ठ'- अपर्णा नाईक.

सैनिक टाकळी (प्रतिनिधी)


फास्टफूड च्या जमान्यात घरची भाजी भाकर कधीही श्रेष्ठ असुन आरोग्यासाठी अत्यंत पोषक आहार असलेचे  मत प्रसिद्ध क्लीनिकल सायकॉलॉजिस्टअपर्णा नाईक यांनी केले.

 त्या येथीलश्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये किशोरवयीन मुलींना समजावून घेताना या कार्यक्रमामध्ये बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक ए.टी.गुरव होते. यावेळी त्या पुढे म्हणाल्या किशोरवयीन मुलांना समजून घेतांना  प्रामुख्याने पालकांची भूमिका महत्त्वाची असते यासाठी विश्वासाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. कार्यक्रमांमध्ये त्यांनी इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलींना आरोग्य विषयी माहिती सांगितली . कार्यक्रमासाठी सर्व माता पालक उपस्थित होत्या . उपस्थित माता पालकांना त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एम.एम धुमाळे  यांनी तर आभार एस.ए.बावचे यांनी मानले.