Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

लायन्स क्लब ऑफ शिरोळचे कार्य अभिमानास्पद : ला. सुनील सुतार लायन्स क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात

शिरोळ : प्रतिनिधी : 


सामाजिक व शैक्षणिक आणि आरोग्य यासह विविध क्षेत्रात विधायक उपक्रम राबवून लायन्स क्लब ऑफ शिरोळने शहर व परिसरात चांगला लोकांश्रय मिळवला आहे लायन्स क्लबचे सुरू असलेले  आदर्शवत कार्य सर्वांनाच अभिमानास्पद असेच आहे असे प्रतिपादन लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल ला. सुनील सुतार यांनी केले


येथील समर्थ मंगल कार्यालयात लायन्स क्लब ऑफ शिरोळच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी ला. सुनील सुतार हे बोलत होते  बुधाजी चुडमुंगे यांनी ध्वजवंदन केले राष्ट्रगीत गाऊन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली रामप्रसाद पाटील यांनी स्वागत केले लायन्स क्लब ऑफ शिरोळचे माजी अध्यक्ष व झोन चेअरमन सचिन माळी यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा आपल्या प्रस्ताविकात घेतला यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला युवराज पाटील व भालचंद्र सासणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला

लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल विजय राठी यांनी लायन्स क्लब मध्ये सहभागी झालेल्या नवीन सदस्यांना शपथ देऊन आपल्या कर्तव्याची माहिती दिली यावेळी ते म्हणाले की सामाजिक कार्यातून लायन्स क्लबने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून या क्लबचे सदस्य होणे हे आपले भाग्यच असून लायन्सच्या माध्यमातून असेच आदर्शवत काम सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी केले

माजी प्रांतपाल सुनील सुतार यांनी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुनील देशमुख सेक्रेटरी भास्कर पाटील खजिनदार अभिजीत गुरव प्रथम उपाध्यक्ष प्रवीण उर्फ भैय्या चौगुले द्वितीय उपाध्यक्ष अभिजीत माने यांच्यासह संचालक रामप्रसाद पाटील किशोर पाटील - रेंदाळकर महेश मोरे चंद्रशेखर पाटील- बारवाडकर बुधाजी चुडमुंगे युवराज पाटील- बारवाडकर सचिन माळी सनीसिंग पाटील सर्जेराव पाटील विशाल कोरे यांना शपथ देऊन त्यांच्या कर्तव्याची माहिती देत लायन्स क्लबचे नाव मोठे करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहावे विविध उपक्रमातून वंचित व गरजूंना मदत करावी नैसर्गिक आपत्तीच्या काळात पुढे येऊन मदतीचा हात द्यावा असे आवाहन त्यांनी केले

यासमारंभात लायन्स क्लबचे सदस्य अभिजीत माने डॉ उमेश कळेकर डॉ अशोक कोटीगिरे महेश मोरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल तर तेजस पाटील अपूर्व पाटील बारवाडकर आदिती गुरव या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला 

लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष सुनील देशमुख यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे सोनं करीत सामाजिक क्षेत्रात विविध विधायक उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू असा विश्वास तर त्यांनी व्यक्त केला

माजी आमदार उल्हास पाटील नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भाजपा नेते अनिलराव यादव दलितमित्र डॉ अशोकराव माने युवा नेते सौरभ शेट्टी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दिलीपराव माने यांनी लायन्स क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

यावेळी लायन्स क्लबचे रिजन चेअरमन रवीकिरण गायकवाड ऍड विजय जगदग्नी अजित गतारे संदीप रायान्नावर गजानन चव्हाण मनोज पाटील राजेंद्र बांदिवडेकर सुरेश बागडी प्रसन्न पाटील अमोल देशमुख एम एस माने डॉ विशाल चौगुले राहुल खोत डॉ सुशांत पाटील डॉ रवींद्र भोसले दिगंबर माने यांच्यासह लायन्स क्लबचे सर्व सदस्य पदाधिकारी शिरोळ शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते भास्कर पाटील यांनी आभार मानले