Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

अकिवाटच्या प्रभाग तीन मधील सदस्यांनी भरवला जनता दरबार.

अकिवाट:


अकिवाट ता. शिरोळ येथील प्रभाग तीन मधील ग्रामपंचायत सदस्यांनी अनोखा उपक्रम राबविला. महाराष्ट्रातील आमदार आमसभा घेतात.विविध मंत्रिमंडळ कामाबाबत अधिवेशने घेतात. त्याचप्रमाणे अकिवाटमध्ये प्रभाग तीनमधील सदस्यांनी जनता दरबार ठेवला.या जनता दरबारामध्ये प्रभागांमधील अडचणी,उपाययोजना व केलेल्या कामासंदर्भात चर्चा झाली.त्यावेळी जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्यावरती उपाययोजना करण्याचे ठरवले.तसेच पुढील चार वर्षाचा प्रभागातील विकासाचे रोल मॉडेल लोकांना सांगण्यात आले.

        प्रभागामधील उच्चशिक्षित नूतन सदस्य शितल हळींगळे (सर) यांच्या संकल्पनेतून जनता दरबार भरण्यात आले होते. त्यावेळी वार्डामधील कोणत्याही समस्या असल्यास लेखी,फोन,किंवा तोंडी स्वरूपात आपल्या समस्या सांगू शकता.तसेच गोरगरीब जनतेच्या मुलांचा शिक्षणाचा खर्चसुद्धा मी स्वखर्चातून करीन.असे प्रतिपादन शितल हळींगळे सर म्हणाले.

 यावेळी शिवसेनेचे नेते बाळसिंग रजपूत सर,माजी सरपंच विशाल चौगुले यांनी आपल्या मनोगतामधून सदस्यांचे कौतुक केले तसेच यापुढे आपले काम असेच चालू राहू दे.अशा शुभेच्छा दिल्या.PSI पदी निवड झालेले अक्षय चौगुले यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी मदत करीन.असे आपल्या मनोगतामधून भावना व्यक्त केल्या.

       त्यावेळी गावांमधील विविध क्षेत्रांमधून नावलौकिक केलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच विविध क्षेत्रांमध्ये निवडी झालेल्या मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.अक्षय चौगुले,आशिष अरुण फरांडे,रसिका अशोक सरंगले,सृष्टी भरत फरांडे,श्रेयश बाबासो होस्कल्ले,बाबासो होसकल्ले,विराज कल्लण्णावर,नरसु शिरगुप्पे या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी उपस्थित नूतन ग्रामपंचायत सदस्य सुनिता माने,सुजाता बडबडे,निवृत्त सैनिक भीमसेन माने,ज्येष्ठ नागरिक अब्बास मकानदार,माणुसकी फाउंडेशन अकिवाटचे अध्यक्ष रमेश कांबळे,शिवसेनेचे नेते पांडूसिंग रजपूत,दिलीप कागे व ग्राम सुधारणा आघाडीचे सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत बिरनाळे यांनी केले.आभार विनोद हुंडेकरी यांनी मांडले.त्यावेळी वार्डामधील तरुण व जेष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच झालेल्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.