प्रियंका पवार यांची पीएचडी साठी युरोपच्या युनिव्हर्सिटीमध्ये निवड
शिरोळ : प्रतिनिधी :
येथील कु प्रियंका विजय पवार यांची ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयावर पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली असून त्यांची युरोप देशातील स्लोव्हकीया येथील कॉमिनस या युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली आहे
पिंपरी चिंचवड येथील डॉ डी वाय पाटील कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रियंका पवार यांची पीएचडीसाठी निवड झाल्याबद्दल शिरोळचे नगरसेवक व भारतीय जनता युवा मोर्चाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष डॉ अरविंद माने यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी विजय पवार रूपाली पवार आकाश पवार आप्पासो जाधव राहुल माने ऋषिकेश माने सागर काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
देश रक्षणासाठी आपले आयुष्य खर्ची घातलेले माजी सैनिक ऑडनरी नायब सुभेदार विजय धोंडीराम पवार यांची प्रियंका पवार कन्या असून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण जयसिंगपूर कॉलेज येथून घेतले आहे तर पदव्युत्तर शिक्षण डॉ डी वाय पाटील कॉलेज पिंपरी चिंचवड येथे घेत असून त्यांनी ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयावर पीएचडी मिळवण्याकरिता शिष्यवृत्ती प्राप्त केली असून या अंतर्गत त्यांची युरोपमधील स्लोव्हकीया येथील कॉमिनस या युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे