Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

लोकप्रबोधन कार्यक्रमातून गणेश उत्सव साजरा करा : रोहिणी सोळुंके - शिरोळ येथे गणेश उत्सवानिमित्त शांतता बैठक संपन्न ; सार्वजनिक तरुण मंडळाची उपस्थिती

शिरोळ प्रतिनिधी


गणेशोत्सव सोहळा साजरा करताना पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियम ,अटी व कायद्याचे पालन केले पाहिजे . अति उत्साही काही कार्यकर्त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊ नये याची दक्षता घ्यावी .  पर्यावरण पूरक व परिवर्तनशील सामाजिक कार्यक्रमातून लोक प्रबोधनासाठी सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घेण्याची गरज असून गणेश उत्सवाच्या उपक्रमशील कार्यक्रमातून आदर्श गावाची संकल्पना निर्माण करावी लागेल , असे मत जयसिंगपूर  उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळुंके यांनी व्यक्त केले

       येथील समर्थ मंगल कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी शिरोळ पोलीस ठाणे च्या वतीने श्री गणेशोत्सव सोहळा शांतता समितीची बैठक झाली .या बैठकीत मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी सोळुंके बोलत होत्या . दरम्यान शिरोळ पोलीस ठाणे व शिरोळ शहर पत्रकार संघ यांच्या वतीने यावर्षी शिरोळ शहर व ग्रामीण अशा दोन विभागात श्री गणराया अवार्ड स्पर्धा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगीड्डे यांनी गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात प्रशासनाबाबत राबविण्यात येणाऱ्या नियमावली माहिती देऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेत यावर्षी तरुण मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले 

        यावेळी शिरोळ शहर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी स्वागत केले पत्रकार संघाचे अध्यक्ष  डी.आर.पाटील यांनी गणराया अवार्ड विषयी माहिती देऊन या उपक्रमात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा आणि आनंदाने व शांततेत गणेशोत्सव साजरा करून सहकार्य करावे असे आवाहन केले  शिरोळ महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता एम एस गलांडे , शिरोळ नगरपरिषदेचे अभियंता प्रमोद खोंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी धनाजी पाटील -नरदेकर  ,विकास पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी काही सूचना मांडल्या . पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने यांनी सूत्रसंचालन केले यावेळी पोलीस प्रशासन,सार्वजनिक मंडळ आणि नागरिक यांचा समन्वय साधून शांततापूर्ण  व आनंदी वातावरणात यावर्षीचा गणेशोत्सव लोकप्रबोधन उपक्रमातून साजरा करण्याबाबत चर्चा झाली.आभार डॉ दगडू माने यांनी मानले.  या बैठकीस शिरोळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या अर्जुनवाड  , शिरोळ ,  घालवाड , शिरटी , हसुर  ,मौजे अगर ,संभाजीपूर यासह १५  गावातील सार्वजनिक तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

----------