शिरोळच्या विवांश पाटील- कणंगलेकर यांचा सलग एक तास स्केटिंगचा विश्वविक्रम
शिरोळ : प्रतिनिधी
येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याशी संलग्न असलेल्या दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या रोलर स्केटिंग अकॅडमी च्या १४ मुलांनी तर जयसिंगपूर तेज रोलर स्केटिंग अकॅडमी च्या २१ मुलांनी सलग एक तास स्केटिंग करून चार विश्वविक्रम नोंद केले. यामध्ये शिरोळ दताजीराव कामगार कल्याण मंडळाचा
विवांश किरण पाटील- कणंगलेकर यां खेळाडूचा विश्वविक्रम नोंदीमध्ये महत्वपूर्ण पुढाकार होता.
या स्केटींग विश्वविक्रम मध्ये ग्लोबल जीनियस रेकॉर्ड , दि मिरॅकल रेकॉर्ड , वज्र इंटरनॅशनल रेकॉर्ड , होप इंटरनॅशनल रेकॉर्ड अशी चार विश्व रेकॉर्ड त्या खेळाडूंच्या नावावर नोंद झाली आहेत . या 35 विद्यार्थ्यांमध्ये विवांश किरण पाटील- कणंगलेकर या विद्यार्थ्यांचा समावेश असून स्केटिंग खेळातील नैपुण्यामुळे विवांश यांचा सहभाग महत्वाचा होता.
दरम्यान संपूर्ण भारतामध्ये साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी हा उपक्रम एकाच वेळेला राबवला आहे . हा उपक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. स्केटींग
खेळाडू विवांश यांना रेकॉर्डचे ऑर्गनायझर व स्केटिंग प्रशिक्षक सुभाष काळे व तेजस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तर दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील व कार्यकारी संचालक एम. व्ही पाटील यांचे त्यास सहकार्य लाभले.
------------