राजश्री शाहू विद्यामंदिरात पाककला स्पर्धा उत्साहात
शिरोळ प्रतिनिधी
येथील राजश्री शाहू विद्यामंदिर क्रमांक १ या शाळेत प्रधानमंत्री पोषणशक्ती या अभियानांतर्गत तृणधान्य पाककला स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत प्रथम -विजया रावण द्वितीय- सुप्रिया गावडे तृतीय- श्वेता स्वप्निल मोरे यांनी अनुक्रमे यश मिळवले
तृणधान्यापासून विविध उत्कृष्ट आणि पौष्टिक असे पदार्थ या पाककला स्पर्धेसाठी स्पर्धकांनी तयार करून आणले व आपल्या पदार्थांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती स्पर्धेत सहभागी स्पर्धक माता सखी सावित्री मंचच्या अध्यक्षा उपाध्यक्षा सर्व सदस्य यांचे स्वागत अध्यापक बाळासाहेब कोळी यांनी केले
मीना बागे सरिता माने हेमलता जाधव यांनी पाककलेचे परीक्षण करून विजेत्या स्पर्धकांची नावे निवडली
वीरश्री पाटील यांनी तृणधान्यापासून कोणते पदार्थ बनवता येतात तसेच मुलांचा आहार खेळ आणि अभ्यास याविषयी मार्गदर्शन केले तर मानवी जीवनातील तृणधान्याचे महत्त्व आणि आरोग्याचे फायदे या विषयी अध्यापक दीपक वावरे यांनी मार्गदर्शन केले
या सोहळ्यात सखी सावित्री मंचच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यानंतर मीना बागे यांनी सावित्री सखी मंचच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली
हा सोहळा पाडण्यासाठी अध्यापिका विमल वर्धन भारती इंगळे तेजस्विनी पाटील प्रियंका जगदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाककला स्पर्धेत प्रथम- विजया रावण द्वितीय- सुप्रिया गावडे तृतीय- श्वेता स्वप्निल मोरे यांनी यश मिळवले विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतल्याने ही स्पर्धा अमाप उत्साहात पार पडली मुख्याध्यापिका अशा शहापुरे यांनी प्रास्ताविक केले अध्यापक रमजान पाथरवट यांनी आभार मानले