Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करा पत्रकारांनी तोंडाला फासले काळे केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाची निवेदनाद्वारे मागणी

शिरोळ : प्रतिनिधी : 


राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागु करण्यात आला आहे. पत्रकारांच्या संरक्षणात कायद्यात अनेक कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत. पण याची अजून कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही ही पत्रकारांच्यासाठी अत्यंत  दुर्दैवी बाब आहे. याचा निषेध म्हणून  केंद्रीय लोकशाही पत्रकार संघटनेच्यावतीने स्वतःच्याच तोंडाला काळे फासून  तीव्र निषेध करण्यात आला व मागणीचे निवेदन शिरोळ तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना देण्यात आले

कायद्याला न जुमानणारी आणि कायद्याला आपल्या सत्येच्या जोरावर पाय धुळी तुडविणारी पाचो-यातील आमदार किशोर पाटील यांच्या सारखी प्रवृत्ती तयार होत आहेत ही प्रवृत्ती वेळच्या वेळी बंद केली नाही तर पत्रकार संरक्षण कायदा कुचकामी ठरणार आहे. या कायद्याचे महत्त्व कमी होणार आहे आणि यामुळे पत्रकाराच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे. कायद्यापेक्षा कोणी लोकप्रतिनिधी मोठा असूच शकत नाही यासाठी पत्रकाराला जाहिरपणे धमकी देणारे आणि त्यांच्यावर हल्ला करायला लावणारे आमदार किशोर पाटील यांची आमदारकी रद्द करा आणि भर चौकात पत्रकार संदिप महाजन यांना मारहाण करणाचा गुंडांच्यावर आणि आमदारावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावे

तसेच आमदार किशोर पाटील यांच्या धमकीनुसार पत्रकार संदिप महाजन यांनी पोलिसांच्याकडे कारवाई करून पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली होता पण पोलिसानी याची कोणताही दखल न घेतल्यानेच पत्रकार संदिप महाजन यांच्यावर  जीवघेणा हल्ला करण्यात आला या सर्व गोष्टीला संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना दोषी धरून त्यांना निलंबित करावे अन्यथा केंद्रीय लोकशाही पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला यावेळी संजय भोसले , गंगाराम सातपुते, प्रभाकर माने, रोहित जाधव, युवराज नलावडे, अल्ताफ मुल्ला यांच्यासह केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते