रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचा स्तुत्य उपक्रम : अमरसिंह पाटील शिरोळ बस स्थानकास वृक्षकुंडी व कचरापेटींची भेट
शिरोळ : प्रतिनिधी :
शिरोळ शहराच्या विकासात आणि वैभवात योगदान देत असताना रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीच्या वतीने सामाजिक आणि विधायक असे स्तुत्य उपक्रम राबविले जात आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी व्यक्त केले
महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत लोकसहभागातून सर्व बसस्थानकांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे या अनुषंगाने कुरुंदवाड आगाराचे व्यवस्थापक नामदेव पतंगे यांच्या पुढाकारातून शिरोळ बस स्थानकात हे अभियान राबविण्यात येत आहे बसताना त्यात पर्यावरणाचा समतोल राहावा हा संदेश देण्यासाठी आणि वृक्ष संवर्धनासाठी रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्या वतीने वृक्ष कुंडी आणि कचरापेटी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते भेट देण्यात आली यावेळी पाटील बोलत होते श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजीत कदम या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते
या समारंभात रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्यावतीने नूतन उपनगराध्यक्षा सौ करुणा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला
या समारंभात एसटी प्रवाशी व कनवाडच्या अंगणवाडी सेविका सायराबानू नयनी यांनी सुद्धा रोटरी क्लब हेरिटेज सिटीच्या सामाजिक उपक्रमाचे आपल्या मनोगतामधून कौतुक करून या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या
कुरुंदवाड आगाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला स्वागत व प्रस्ताविक वाहतूक नियंत्रक आशपाक नालबंद यांनी केले आगार व्यवस्थापक सुरेश शिंगाडे यांनी आभार मानले रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय तुकाराम शिंदे सचिव तुकाराम पाटील ट्रेझरर संजय रामचंद्र शिंदे इव्हेंट चेअरमन महेश माने सदस्य व नगरसेवक डॉ अरविंद माने डॉ अतुल पाटील प्रा काशिनाथ भोसले विवेक फल्ले उल्हास पाटील भरत गावडे चंद्रकांत भाट यांच्यासह सर्व सदस्य वाहतूक निरीक्षक सलीलअहमद देशमुख सहाय्यक वाहतूक निरीक्षक रवींद्र भोसले वाहतूक नियंत्रक संजय पोकळे एस टी कामगार नेते निनाद भोसले वाहक शशिकांत राजमाने चालक राजेंद्र कांबळे यांच्यासह कर्मचारी एसटी प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते