Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

शिरोळ व हातकणंगले तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी पंडित काळे यांची सलग तिसऱ्यांदा फेरनिवड

शिरोळ : प्रतिनिधी :


शिरोळ व हातकणंगले तालुका सेवानिवृत्त महसूल कर्मचारी संघटनेच्या सर्वसाधारण सभेत सन २०२३-२४ ते सन २०२५-२६ या तीन वर्षाच्या कालावधीकरीता संचालक मंडळाची निवड करण्यात आली संघटनेच्या अध्यक्षपदी  शिरोळचे नगरसेवक पंडीत  काळे (बापूजी) याची सलग तिस-यादा  एकमताने फेर निवड झाली, तर उपाध्यक्षपदी सलीम मुजावर व सचिवपदी  बापूसाहेब गंगधर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे

या सर्वसाधारण सभेत  संचालक मंडळाची एकमताने बिनविरोध  निवड करण्याआली.निवडीनंतर,  उत्तम कोली, विनायक पाटील, आनंदा पाटील यानी आपल्या मनोगतात बिनविरोध निवड झालेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

नूतन संचालक मंडळात अध्यक्ष - पी. एन. काळे, उपाध्यक्ष - एस. ए. मुजावर, सचिव - बी. जी. गंगधर, संचालक.- आर. बी. चौगुले, ए. आर. कांबळे, ए. जी. पाटील, एच. डी. हातळगे, आय. एम. मुल्ला, एस. बी. सुतार, व्ही. बी. पेटकर, एस. जी. कोळी, बी. वाय. कोले, के. एस. लोहार, एस. एस. पाटील, व्ही.बी. मांगुरे. यांची संचालक म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे