घोसरवाडच्या शंभूराजे गणेशोत्सव मंडळाचे सर्वत्र कौतुक . दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी.
घोसरवाड. वार्ताहर.
घोसरवाड ता शिरोळ येथील शंभूराजे गणेशोत्सव मंडळाने आकर्षक अशी श्रींची मुर्तीची प्रतिष्ठापना करून मंदिर स्वरुपाची मंडप ऊभारुन तमाम भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
येथील शंभूराजे गणेशोत्सव मंडळाने प्रतिवर्षी पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात श्रींची मुर्ती स्थापनेपासून ते विसर्जना पर्यंत अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये हा गणेशोत्सव साजरा करतात त्यामुळे घोसरवाड सह पंचक्रोशीत त्यांचे विशेष कौतुक होत आहे यावेळी शंभूराजे गणेशोत्सव मंडळाने आकर्षक अशी श्रींची ची प्रतिष्ठापना करुन मंदिर स्वरुपाची मंडप ऊभारणी करून तमाम भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे विशेष म्हणजे श्री गणपती देवासाठी त्यानी चांदी केली आहे त्यामुळे श्रींची मुर्ती अधिक आकर्षक दिसत आहे दररोज पुजा अर्चा व सोमवार दि 25 रोजी महाप्रसाद व रात्री जयभवानी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भाविकांची मोठया प्रमाणात ऊपस्थिती होती
शंभूराजे गणेशोत्सव मंडळाचे सामाजिक युवा कार्यकर्ते शितल पुजारी सुशांत कोकणे अमोल नरदे यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष सुदर्शन कोकणे ऊपाध्यक्ष पार्श्व नरदे सचिव तेजपाल पुजारी व सदस्य माजी सैनिक शरद कागले तुकाराम पुजारी जयसिंग शिंदे रोहित कोकणे रुषिकेश कोकणे अवधुत कोकणे ऊमेश हेरवाडे सुरेश हेरवाडे सतिश हेरवाडे चंद्रकांत हेरवाडे डॉ अमोल चौगुले ऊत्तम गावडे संतोष होगाडे रोहन कालवे महेश कागले गणेश कागले विनायक चव्हाण शिवानंद माळी शिवराज बाजीराव नाईकवाडे वैभव नाईकवाडे व राजु आप्पासो चौगुले हे गणेशोत्सव ऊतसाहात साजरा करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत त्यांच्या या कार्याचे घोसरवाड सह पंचक्रोशीत विशेष कौतुक होत आहे .