Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

चिकोडी निपाणी तालुक्यातील अडसाली ऊस लागणीच्या हंगामाला जोराची सुरुवात.

 सदलगा --


चिकोडी निपाणी तालुक्यातील अडसाली ऊस लागणीच्या हंगामाला जोराची सुरुवात.

रोपवाटिकेतील उसाच्या रोपांना चांगली मागणी. रोपांचा दर मात्र एक रुपये पन्नास पैशास एक या प्रमाणे आहे.

चिकोडी व निपाणी तालुक्यातील दूधगंगा नदी किनाऱ्यावरील अनेक गावांमध्ये आडसाली ऊस लागणीच्या हंगामाला जोमाने सुरुवात झाली असून ,शेतकरी रोपवाटिकेतील उसाच्या रोपांना प्राधान्य देत आहे. कारण पावसाने दडी घेतली असून पाऊस केव्हा जोराचा होईल याचा नेम नसल्याने रोपे लावण्यात शेतकरी मग्न आहे.

सदलगा शहराच्या आसपासच्या जनवाड, बोरगाव ,शिरदवाड, शमणेवाडी, बेडक्याळ, भोज, कारदगा, डोनेवाडी, सदलगा, एकसंबा, मलिकवाड, भैनाकवाडी, वडगोल, मांजरी, कल्लोळ या परिसरात अडसाली ऊस लागणीच्या हंगामाला आता जोर धरला असून शेतकरी ऊस लागणीच्या कामात मोठ्या प्रमाणात गुंतलेले आहेत ,परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण फारच कमी असल्याने पुढील कालावधीमध्ये पाण्याचा पुरवठा होणार का? यावर मात्र शेतकरी चिंतेत आहेत. तरीही धाडसाने मोठ्या प्रमाणात लागणी होत आहेत. सदलगा शहरातील तलाठी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सहा हजार एकर उभ्या उसाचे पीक असून, एक हजार पाचशे एकरांवरं इतर पिके असून ,आडसाली उसासाठी अंदाजे दीड ते दोन हजार एकर शिल्लक असल्याचे सांगितले.