दत्तवाड येथे युवा स्पोर्टने जपली सामाजिक बांधिलकी
दत्तवाड ---
येथील युवा स्पोर्ट्स गणेश उत्सव मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या विसर्जन मिरवणुकीत चंद्रयान मोहीम व दूधगंगा बचाव या ज्वलंत विषयाच्या देखावे करून प्रबोधनाचे काम केल्यामुळे नागरिकात कौतुकाचा विषय झाला आहे.
युवा स्पोर्ट्स गणेश उत्सव मंडळाचे हे 35 वर्ष असून ते नेहमीच सामाजिक बांधिलकी अंधश्रद्धा निर्मूलन समाज प्रबोधन करणारे देखावे करतात यावर्षी दतवाड सह परिसरात जून मध्ये नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते यातच इचलकरंजी शहराला पाणी देण्याचा प्रस्ताव आल्याने कागल व शिरोळ तालुक्यातील दत्तवाड परिसरातील नागरिकांनी विरोध केला यासंबंधी या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत डिजिटल फलक पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, देणार नाही देणार नाही पाणी आम्ही देणार नाही, जमिनी आमचे पाणी तुमचे कसे,
अशा आशियाच्या फलकासह काळमवाडी धरणापासून दत्तवाड पर्यंत दूधगंगा नदीवर पाण्यावर असणाऱ्या विविध योजना व पाण्यावर आमचा हक्क कसा हे सांगणारे बोर्ड लावून नागरिकात प्रबोधन केले याबद्दल मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे
यावेळी प्रवीण नेजे ,युवराज पोळ ,विनोद पोळ,अनिरुद्ध सिदणाळे, हर्षवर्धन दानवाडे, सचिन मनगोळे,राहुल धुपदाळे, सुनील खरोशे,शीतल नेजे,राम दानवडे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.