पेटकरी गणेश उत्सव मंडळाने दूधगंगा नदी बचाव यावर देखावा सादर करून केले समाज प्रबोधन
दत्तवाड --
येथील पेटकरी गणेश उत्सव मंडळांनी दूधगंगा नदी बचाव यावर देखावा सादर करून समाज प्रबोधन केले असून सध्या जिल्ह्यातील गाजत असणाऱ्या या प्रश्नावर देखावा केल्यामुळे नागरिकांच्या कौतुकाचा विषय होत आहे.
1963 साली स्थापन झालेल्या पेटकरी गणेश उत्सव मंडळाने दरवर्षी विविध विषयाचे समाज प्रबोधन, करण्यासाठी अग्रेसर आहे याबरोबरच समाजातील विविध चालू घडामोडी वर आधारित विषयांचे समाजाला प्रबोधन करण्यात गणेश मंडळ अग्रेसर आहे.
गेली वर्षभर गाजत असलेल्या दुधगंगा पाणी योजनेच्या दत्तवाड परिसरातील नागरिक शेतकरी यांच्या जीवनावर होणारा परिणाम शेतीवर होणारा परिणाम हा प्रभावपणे दाखवून काळमवाडी धरणापासून दत्तवाड पर्यंत नदीचे पात्र दाखले आहे याबरोबरच ऐन मे व जून महिन्यात कोरडी पडलेली नदी नदीपात्रात ग्रामपंचायतीने पाण्यासाठी मारलेली कुपनलिका या गोष्टी दाखवून दूधगंगा इचलकरंजी शहरासाठी पाणी दिल्यास दत्तवाड नागरिकांचे शेती नष्ट होणार असल्याचे चित्र उभा करून समाज प्रबोधन केले आहे. याबद्दल या मंडळाचे दत्तवाड सह परिसरात कौतुक होत आहे
या देखावासाठी मंडळाचे सर्वच कार्यकर्ते परिश्रम घेतले आहे