जालना जिल्ह्य़ात सकल मराठा समाजाच्या अंदोलकांवर झालेल्यां अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ घोसरवाड बंद ठेवून निषेध फेरी काढण्यात आली .
जालना जिल्ह्य़ात सकल मराठा समाजाच्या अंदोलकांवर झालेल्यां अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ घोसरवाड बंद ठेवून निषेध फेरी काढण्यात आली .
घोसरवाड. वार्ताहर.
जालना जिल्ह्य़ातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या आमानुष लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ आज घोसरवाड गाव बंद ठेवून निषेध फेरी काढण्यात आली .
ग्रामपंचायतीच्या चौकात प्रचंड मोठया प्रमाणात मान्यवर युवावर्ग व ग्रामस्थ जमले होते यावेळी माजी सरपंच धनपाल जुगळे ,शिरोळ तालुका मराठा फौंडेशन चे अध्यक्ष नंदकुमार नाईक .माजी सरपंच मयुर खोत. आप्पासो पाटील. प्रमोद कांबळे. राकेश कागले.अशोक कमते.विनोद मोडके.प्रविण पाटील. दादा पाटील. पिंटू मगदूम. प्रशांत नाईक. राजू कोळी .यांचेसह आदी मान्यवर युवावर्ग ग्रामस्थ ऊपस्थित होते . यावेळी माजी सरपंच धनपाल जुगळे व मराठा फौंडेशन शिरोळ तालुका अध्यक्ष नंदकुमार नाईक यांनी मनोगत व्यक्त केले . त्यानंतर गावातून निषेध फेरी काढण्यात आली . या बंद ला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आज सकाळपासून गावातील सर्व व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्यात आले होते .