Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

मौजे आगरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात

शिरोळ: प्रतिनिधी :


विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस व शिक्षक दिन उत्सहात संपन्न झाला

 शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे ,  सचिव मेजर के. एम भोसले, खजिनदार  कृष्णात पाटील , मौजेआगरचे  सरपंच अमोल चव्हाण , संचालक ,  भगवान कांबळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक  खंडेराव जगदाळे यांनी केले शिक्षिका सौ. जयश्री पाटील

 शिक्षक नितिन बागुल यांनी आपल्या मनोगत मध्ये डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाचा आढावा शिक्षकांच्या जबाबदारी याबद्दल मार्गदर्शन केले संस्थेचे सचिव मेजर के. एम भोसले यांनी आपल्या मनोगतातून भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थान घडवतो असे प्रतिपादन केले शिरोळ येथिल डॉ. वैभव हुग्गे व त्यांच्या संपूर्ण टिमने आमच्या विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे पेन , गुलाब पुष्प देऊन सर्वांचा सन्मान केला . विद्यालयातील विद्यार्थी स्वतःह शिक्षक बनले व त्यांनी पूर्ण दिवस भर अध्ययन अध्यापन केले . त्यामध्ये इयत्ता ८ वी मधील साद शेख , स्वालिहा शेख , यश पोतदार , वैष्णवी जाधव , सायली चव्हाण , महेक शेख , प्रेरणा पुजारी , ओंकार लाड , आदित्य झोरे , आर्यन झोरे , अश्विनी नाईक , नंदिनी शिंदे , तहूरा मुल्ला , इत्यादी विद्यार्थांनी अध्यापन कार्ये केले.आभार प्रदर्शन विद्यालयाच्या  शिक्षिका सौ. निता कांबळ यांनी केले .कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख पृथ्वीचंद माछरेकर यांनी केले . शिक्षकेतर कर्मचारी सर्जेराव पोवार ,  सिद्धार्थ कांबळे व सौ. सुप्रिया दाभाडे यांचे सहकार्य लाभले .