न्यू इंग्लिश स्कूलचे आदर्शवत कार्य: किशोर सावंत - देसाई शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात पुरस्कार वितरण व माजी सैनिकांचा सत्कार
शिरोळ : प्रतिनिधी
स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करुन वाटचाल करावी. तरच यशाची शिखरे प्रादक्रांत करता येतील. मौजे आगरमधील श्री विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यु इंग्लिश स्कुल या शिक्षण संस्थेने अनेक गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थी घडविल्याने त्यामुळेच ते उच्च स्थानावर कार्यरत आहेत. या ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेचे कार्य आदर्शवत आणि उज्वल असल्याचे प्रतिपादन भारतीय विमा विभागाचे सेवानिवृत्त विकास अधिकारी किशोर सावंत देसाई यांनी केले.
मौजे आगर (ता.शिरोळ) येथील विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल या संस्थेचा२६ वा वर्धापन सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंत देसाई बोलत होते.
उपस्थित मान्यवराच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रदर्शन शुभारंम करण्यात आला . त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेर्यांचा शुभारंम हैदरअली शेख यांच्या हस्ते करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष जगदिश पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिक्षण संस्थेच्या वतीने देशाचे रक्षण करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातलेल्या माजी सैनिकांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच युवा रत्न पुरस्काराने प्रविण डुबल , आदर्श माता पुरस्काराने श्रीमती सुशिला महादेव भोसले, श्रीमती मालोभाई रामचंद्र चव्हाण उद्योग रत्न पुरस्काराने हणमंत उर्फ दादासो इंगळे यांना सन्मानित करण्यात आले.
स्वागत करताना शिक्षण संस्थेचे सचिव प्रा.मेजर के.एम.भोसले म्हणाले, आजच्या धावत्या युगात अनेक बदल झालेले आपण पाहतो आहे. मात्र ज्यावेळी काही साधने नव्हती अशा काळात संस्था उभारुन शाळा सुरु करणे ही बाब आव्हानात्माक होते. त्यावेळी लावलेले हे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. यातून हजारो विद्यार्थी घडले असून लवकरच या ठिकाणी ज्युनिअर कॉलेज सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी व इंग्रजी भाषेत शाळेविषयी मनोगत व्यक्त केले
यावेळी शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी उपनगराध्यक्षा सौ कमलाताई शिंदे मौजे आगारचे सरपंच अमोल चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटना विद्यार्थी विभागाचे अध्यक्ष सौरभ शेट्टी, शिरोळ तालुका खादी ग्रामोद्योग सहकारी संघाच्या चेअरमन सौ प्रतिभा भोसले शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडेे, खजिनदार कृष्णात पाटील, संचालक संग्रामसिंह देसाई, सुरेशराव पाटील भगवानराव कांबळे, अनुसया चव्हाण, सुनिता पवार, विलासराव पाटील, अमित जाधव, अरुण पोटे, तुकाराम पाटील, निनाद भोसले उत्तम भोसले यांच्यासह पदाधिकारी, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानपात्राचे वाचन शिक्षिका जयश्री पाटील, प्रज्ञा मांळकर, यांनी व सुत्रसंचालन नितिन बागूल यांनी केले मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे यांनी आभार मानले