घोसरवाड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन
दत्तवाड - मिलिंद देशपांडे
-आयुष्यमान भव या कार्यक्रमांतर्गत घोसरवाड ता. शिरोळ येथील महेश कला क्रीडा मंडळ व आरोग्य उपकेंद्र घोसरवाड यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात तीनशे पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली.
आरोग्य उपकेंद्र आयुष्यवर्धिनी घोसरवाड यांच्या मार्फत आयुष्यमान भव कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात विविध रक्त तपासणी, रक्तदाब, मधुमेह, तपासणी ,महिलांच्या विविध आजारांची तपासणी, अठरा वर्षावरील तरुणांचे आरोग्य तपासणी करून त्यांना. मोफत औषध उपचार करण्यात आले .
डॉ. भूषण यामाटे, मेरी कानिटकर ,फरनाज सनदी, सुनिता बागल गावातील आशा कार्यकर्त्या यांनी आरोग्य शिबिर यशस्वी केले
यावेळी महेश कला क्रीडा गणेशोत्सव मंडळाचे विशाल कमते , बाळासो खोत , विश्वनाथ गवंडी ,अक्षय नाईक ,राहुल लठ्ठे, अशोक. कमते यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.