कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना प्रतिटन ४०० रूपये दुसरा हप्ता देण्याची मागणी.
सदलगा शहर( प्रतिनिधी )
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेला चांगला दर मिळत असल्याने कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना प्रतिटन ४०० रूपये दुसरा हप्ता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कर्नाटक राज्याचे साखरमंत्री माननीय श्री शिवानंद पाटील यांचेकडे नुकतीच विजापूर येथे घेतलेल्या भेटीत राजू शेट्टी व शिष्टमंडळाने केली.
विजापूर येथे झालेल्या चर्चेमध्ये शिष्टमंडळाने या खालील बाबी सविस्तरपणे मांडल्या ,
४०० रूपये दुसरा हप्ता विना विलंब द्यावा, कर्नाटक राज्यातील वजनकाटे ॲानलाईन करण्यात यावेत व महाराष्ट्र सरकारप्रमाणे कर्नाटक सरकारनेही फसवणूक केलेल्या ऊसतोडणी मुकादमावर कारवाई करण्या संदर्भात माहिती देण्यात आली याप्रमाणे इतर अनेक विविध विषयावर बैठक झाली.
यावेळी बैठकीत मंत्री महोदय शिवानंद पाटील यांनी कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादक व वाहतूकदार यांच्या प्रश्नाबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक लावून तोडगा काढण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी राजू शेट्टी यांनी गेल्या वर्षभरात साखरेला व साखर कारखान्यातील इतर ऊप पदार्थाला चांगला दर मिळाला आहे. कर्नाटक सरकारने गेल्या वर्षी इथेनॅाल उत्पादन करणा-या कारखान्यांनी प्रतिटन १५० रूपये व इतर कारखान्यांनी प्रतिटन १०० रूपये एफ. आर.पी पेक्षा जादा दर देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काटामारीचे प्रमाण जास्त असून राज्यातील साखर कारखान्याचे वजनकाटे ॲानलाईन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.
याबरोबरच कर्नाटक राज्यातील ऊस तोडणी मजूर मुकादमांनीही मोठ्या प्रमाणात फसवणूक केले असून कर्नाटक सरकारने देखील महाराष्ट्र सरकारने ज्यापध्दतीने नोडल ॲाफिसर म्हणून आय ए एस अधिका-याची नेमणूक करून तातडीने संबधित फसवणूक केलेल्या मुकादमावर गुन्हे दाखल करणेबाबत पोलिस प्रशासनाला आदेश देण्याची मागणी केली.
माननीय मंत्री महोदय शिवांनद पाटील यांनी शिष्टमंडळासोबत वरील मागण्याबाबत ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूकदारांसोबत सकारात्मक चर्चा करत राज्य सरकार कडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कर्नाटक सरकारने गेल्या वर्षीच कारखान्यांना एफ आर पी पेक्षा जादा दर देण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच याबाबत न्यायालयातही सरकारच्या बाजूने निकाल लागणार असून त्याचीही अमलबाजावणी करण्यास कारखानदारांना भाग पाडणार असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सावकर मादनाईक , राजेंद्र गड्यान्नावर , संदीप राजोबा , तात्या बसण्णावर , गणेश इळेगेर , बाबूराव पाटील,रावसो अबदान,राजू पाटील,दादा पाटील,प्रविण शेट्टी,विठ्ठल पाटील, महावीर उदगावे, दत्तात्रय बाबर, पंकज तिप्पन्नावर संजय कायकुल्ले यांचेसह चिकोडी , रायबाग , सदलगा, आणि बेळगांव ,विजापूर, बागलकोट या जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी ऊपस्थित होते.