बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर पतसंस्थेचे विधायक व शैक्षणिक कार्यातही उल्लेखनीय योगदान -गट शिक्षण अधिकारी भारती कोळी.
जयसिंगपूर
:येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर शिरोळ तालुका शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर संस्थेची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सोनाबाई इंगळे सभागृहात संपन्न झाली.यावेळी सेवानिवृत्त, आदर्श पुरस्कार प्राप्त सभासद, इयत्ता ४थी व ७ वी प्रज्ञाशोध परीक्षा,शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता १०वी व१२वी मधील यशस्वी गुणवंत विद्यार्थी यांच्या सत्कार सोहळा प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रतिपादन केले.यावेळी तालुका आरोग्याधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर यांनी समाजातील क्षयरोग रुग्णांना दर महिन्याला पौष्टिक व सकस आहारासाठी मदत करणारी जिल्हयातील पहिलीच खर्डेकर पतसंस्था असल्याचे सांगून विधायक कार्याचे कौतुक केले.
शिक्षक बॅंकेचे चेअरमन सुनिल एडके,प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील,राजू जुगळे,दिलीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदिप पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,अनिल ओमासे,महाडिक साहेब,स्मिता डिग्रजे,विजयकुमार पाटील,शांताराम हेमगिरे,रमेश कोळी,मेहबूब मुजावर,संतोष जुगळे,विजय भोसले,प्रकाश खोत,राजाराम सुतार,महेश देशमुख,उत्तम कोळी,मोअज्जम चौगले,दिलीप शिरढोणे,संचालक,सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. स्वागत मदनकुमार कांबळे यांनी तर प्रास्ताविक चेअरमन दत्तात्रय कृष्णा पाटील यांनी केले. सूत्रसंचलन उदय गायकवाड व संभाजीराव कदम यांनी केले.
८०९ सभासद असणाऱ्या संस्थेस६० लाख१६ हजार९७२ रुपयांचा नफा झालेला आहे. खेळते भांडवल- ५८ कोटी ५६ लाख ४८हजार८३३ रुपये असून ठेवी -४८ कोटी ४०लाख६४ हजार ३३ रुपये आहेत तर कर्जवाटप -४६ कोटी ४८ लाख ३३हजार२४७ रुपयांचे केले आहे.
सभासदांकरिता कर्जमाफी योजना भेटवस्तू ,१५ टक्के लाभांश,गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत सभासदांचा सत्कार अशा योजना राबविणेत येतात.
दुसऱ्या सत्रात वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. ताळेबंद पत्रक,इमारत निधी, कर्जमाफी योजना,शेअर्स व कायम ठेव,थकबाकी वसुली या विषयांवर सभासदांनी उपस्थित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. नूतन सभासदांच्या वतीने चेअरमन डी.के.पाटील यांचा सत्कार रविकुमार पाटील व दिलीप शिरढोणे यांनी केले. आकर्षक भेट वस्तू व १५ टक्के लाभांश वाटप करण्यात आले.