राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोफत लाळ- खुरकत प्रतिबंधक लसीकरण अभियान कार्यक्रम संपन्न
सदलगा --
कर्नाटक राज्य जिल्हा पंचायत बेळगाव व पशुपालन आणि पशुवैद्यकीय सेवा विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चिकोडी तालुक्यात राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोफत लाळ- खुरकत प्रतिबंधक लसीकरण अभियान कार्यक्रम.
कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्हा पंचायत बेळगाव व पशुपालन आणि पशुवैद्यकीय सेवा विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत चिकोडी तालुक्यांत मोफत लाळ- खुरकत प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम दिनांक 26 सप्टेंबर 2023 ते 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत चौथ्या फेरी अंतर्गत ही लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे.प्रत्येक वर्षी लाळ -खुरकत हा संसर्गजन्य रोग जनावरांना येण्यापूर्वी प्रतिबंधात्मक लसीकरण अभियान घेतला जातो. या अंतर्गत यावर्षी दिनांक 26 सप्टेंबर 2023 ते 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत चिकोडी तालुक्यातील एकसंबा, नणदी, नणदीवाडी, यादानवाडी, मलिकवाड ,वडगागोल, बहिणाकवाडी, सदलगा, शमणेवाडी व जनवाड या गावापर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार आहे प्रत्येक गाव वार नियोजन केले असून याची माहिती संबंधित गावातील शेतकरी वर्गांना पोहोचविण्यात येणार आहे.लाळ- खुरकत हा रोग विषाणूपासून पसरणारा संसर्गजन्य रोग आहे .त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची काळजी घेण्यासाठी सहा महिन्यातून एकदा लसीकरण करून घ्यावे आणि आर्थिक संकटापासून वाचावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ही लसीकरण मोहीम केंद्र सरकार अंतर्गत असून पूर्णपणे मोफत आहे. या मोहिमेतून संपूर्ण राज्य लाळ- खुराकत मुक्त करण्याचा मानस शासनाचा आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी येऊन ही लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहेत. या अभियान कार्यक्रमातील पशुवैद्यकीय अधिकारी एम डी बुलाखे एकसंबा, ए आर कुपाटी सदलगा, सहाय्यक कर्मचारी संदीप कांबळे, अब्दुल बुलाखे, अभिनंदन इमगौडनवर, रमेश ढाले इत्यादी वर्गाचा समावेश आहे. या अभियान वर्गातील कर्मचारी वर्गाना सहकार्य करून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सदलगा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.