Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

बाल शिवाजी मंडळाचा सद्गुरू बाळूमामा सजीव देखावा पाहण्यासाठी उडाली झुंबड

शिरोळ : प्रतिनिधी 


: येथील श्री बाल शिवाजी मंडळ राजवाडा या मंडळाने गणेशोत्सवानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून ऐतिहासिक धार्मिक यासह समाज प्रबोधनपर सजीव देखाव्याच्या सादरीकरणातून सामाजिक एकात्मता टिकवण्याचा प्रयत्न केला आहे यावर्षी मंडळाच्या वतीने सादर करण्यात येणारा सजीव देखावा श्री.सद्गुरू बाळूमामा हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी झुंबड उडाली आहे

          बाल शिवाजी मंडळ राजवाडाच्या कलाकारांनी सद्गुरू बाळूमामा हा सजीव देखावा सादर करीत असताना संत सद्गुरू बाळुमामा यांचे जीवन चरित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या राज्याला संतांची भूमी म्हणून ओळखली जाते संतांच्या आशीर्वाद मार्गदर्शन आणि विचारानेच प्राणी मात्राचे जीवन सुखमय झाले आहे याची प्रचिती या देखाव्यात दाखवण्यात आली आहे श्री.संत बाळूमामा यांचे लहनापासून थोरापर्यंत, गरीबापासून श्रींमतापर्यंत व अडाण्यापासून विद्वानापर्यंत सर्व थरांतील स्त्री-पुरूष त्यांचे भक्त होते व आहेत.शर्ट, धोतर फेटा, कांबळा, कोल्हापूरी चप्पल हा . सद्गुरु बाळूमामाचा पेहराव भाजी भाकरीचा साधा आहार . ऊन, वारा, पाऊस किंवा थंडी असो..बक-यां सोबत शिवारातचं त्यांचा मुक्काम असून.गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी  भंडारा उत्सव चालू केला.हे सद्गुरु बाळूमामांचे कार्य दाखवण्याबरोबरच बाळूमामांनी आपल्या भक्तांच्या आलेल्या अडचणी कशा सोडवल्या त्याची उत्कृष्ट मांडणी मंडळाचा कलाकारांनी केली आहे त्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक व गणेश भक्तांची मोठी गर्दी होत आहे

बाल शिवाजी मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देसाई उपाध्यक्ष व नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली 33 वर्षे हे मंडळ असे देखावे सादर करीत आहे यासाठी मंडळाचे प्रमुख सदस्य बाळासाहेब गावडे (साहेब ) गजानन संकपाळ भालचंद्र ठोंबरे संदीप चुडमुंगे  अमित संकपाळ दीपक पाटील सचिन सावंत विश्वास चौगुले ज्ञानेश्वर पाटील गुरुदत्त देसाई यांचे मार्गदर्शन लाभत असून या सजीव देखाव्यामध्ये अनुज भोसले मनोज जाधव विनायक पाटील बोरगावे अमर फडतरे कुणाल जगताप सागर काळे साजिद अत्तार सौरभ इंगळे बबलू चुडमुंगे हरीश माने गोरख भाट करण सावंत सागर चुडमुंगे अजित सावंत पारस भाट गुरुदत्त पाटील ऋषिकेश शेळके माणिक धनगर यांच्यासह मंडळातील अनेक सदस्यांनी कलाकार म्हणून आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली असल्यामुळे या देखाव्याचे उत्कृष्ट सादरीकरण होत आहे