Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

ई पीक पाहणी योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा : तहसीलदार अनिलकुमार हेळकर शिरोळात शेतकऱ्यांना मोबाईलवर ई पीक पाहणी अँप संदर्भात मार्गदर्शन


शिरोळ : प्रतिनिधी : 


महाराष्ट्र राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी शेती पिकाची अचूक नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर ई पिक पाहणी हा उपयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे या योजनेचा लाभ शिरोळ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी घेऊन महसूल प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी केले

जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि शिरोळ मधील प्रगतशील शेतकरी शिवाजी चव्हाण यांच्या निवासस्थानी शेतकऱ्यांना मोबाईलवरच्या ॲपद्वारे ई पीक पाहणी उपक्रमा संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर हे बोलत होते

युवा नेते पृथ्वीराज यादव यांनी  स्वागत करून शेतकऱ्यांसाठी शासनाकडून सुरू असलेला हा उपक्रम लाभदायक असून या माध्यमातून आपल्या मोबाईल वरून आपल्या शेतातील स्वतःहून ई पीक पाहणी करता येणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे सांगितले

शिरोळचे मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांनी शासनाने सुरू केलेल्या ई पीक पाहणी योजने संदर्भात माहिती देऊन या योजनेमुळे शेतकऱ्यांना कोणते लाभ होणार आहेत याचे विश्लेषण केले आपल्याला कर्ज मिळणे पिक विमा उतरवणे सातबारावरील पिकांची नोंद यासाठी ई पीक पाहणी आपल्या मोबाईल वरून स्वतःला केवळ तीन मिनिटात करता येणार आहे असे सांगून शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले

शिरोळचे तलाठी संभाजी घाटगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मोबाईल द्वारे ई पीक पाहणी कशी करावी या संदर्भात प्रात्यक्षिक द्वारे मार्गदर्शन केले तसेच उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर ई पीक पाहणी ॲप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घेतला आहे यानंतर चव्हाण यांच्या शेतात जाऊन ई पीक पाहणी करून ॲपवर त्याची नोंदणी करण्यात आली

यावेळी कोतवाल धोंडीराम धामणे शेतकरी संजय उर्फ संभाजी चव्हाण कृष्णराव मोरे पंडित काळे धनाजी पाटील नरदेकर रामचंद्र पाटील बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर रवींद्र कोळी उदय संकपाळ बाबासो पाटील नरदेकर दादासो कोळी उल्हास पाटील गुरुदत्त देसाई दगडू चव्हाण प्रकाश पाटील अनिल साळोखे बाबासो पाटील आयजाक भोरे पिंटू पाटील बबलू शेट्टी सुशांत चव्हाण विजय माने शंतनू चव्हाण नेमिनाथ चौगुले विलास गावडे  उदय उर्फ बॉबी संकपाळ संतोष माने बाबुराव गावडे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अविनाश उर्फ पांडुरंग माने यांनी आभार मानले