Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

रक्षाबंधन सर्वांचे प्रिय बंधन: गायत्री बहेनजी प्रजापिता ब्रह्माकुमारी यांच्या वतीने शिरोळ पालिकेत रक्षाबंधन

शिरोळ : प्रतिनिधी :


     

       मनुष्याने सकारात्मक विचार केल्यास तो कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकतो . मानवी जिवनाला रक्षणाची गरज आहे रक्षण करणारा तो ईश्वर आहे त्याच्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे . बंधन कुणालाही प्रिय नाहीत पण रक्षाबंधन हे एकमेव प्रिय बंधन सर्वांना असल्याचे मत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शिरोळ केंद्राच्या गायत्री बहेनजी यांनी व्यक्त केले

 शिरोळ नगरपरिषद येथे  प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शिरोळ केंद्राच्या वतीने शिरोळ नगरपालिकेत रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता नगराध्यक्ष अमरसिंह पाटील मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना राखी बांधण्यात आली .                                                      या रक्षाबंधन सोहळ्यात बोलताना गायत्री बहेनजी पुढे म्हणाल्या  बंधन कोणालाही प्रिय नसते पण रक्षाबंधन हे सर्वासाठी प्रिय असते . तुमच्या मनगटावरती आम्ही रक्षा सुत्र घेवून आलो आहोत हे ईश्वराचे रक्षा सुत्र आहे . मनुष्याच्या जिवनामध्ये सद् गुणांनी जिवन सुंगंधीत करणारा तो परमपिता परमात्मा आहे . त्याच्याशी आपण सर्वानी प्रामाणिक राहिले पाहिजे .           

    यावेळी प्रजापती ब्रम्हाकुमारीज अर्चना बहेनजी नगरसेवक प्रकाश गावडे , पालिकेचे कर्मचारी अमोल बन्ने ' अर्जुन बल्लारी, सिमा जाधव , सविता कोळी , विनोद बिरणगे यांच्यासह कर्मचारीवर्ग उपस्थित होता .                     .