शिरोळ नगरीत सामाजिक उपक्रम राबवणारे बाजारपेठ गणेशोत्सव मंडळ
शिरोळ :
प्रतिनिधी : शिरोळ नगरी म्हणजेच इथल्या मातीला वेगळाच गंध एक वेगळा छंद अशा या ऐतिहासिक भूमीत कला क्रीडा संस्कृती याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातून समाज प्रबोधन करण्याचा वसा आणि वारसा जोपासला जातो गणेश उत्सवामधून बाजारपेठ गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबवून विधायक कार्य केले आहे.
बाजार पेठ गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव दरम्यान अखंड नऊ दिवस विविध सामाजिक.. उपक्रम राबवत.. समाज प्रबोधन करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे.
देश सेवेसाठी आपले आयुष्य खर्ची घातलेल्या माजी सैनिकांचे हस्ते. गणेशाची आरती आरती करण्यात आली.याचबरोबर मानवता हा एकच धर्म. या मूल्यांची पेरणी करण्याकरता व मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी लघुपट दाखवण्यात आला
सण उत्सव.यात्रा जत्रा अशा अनेक कार्यक्रमांमध्ये.गर्दी गोंधळ होऊ नये कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन योग्य रित्या होण्यासाठी २४ तास कर्तव्य बजावणारे. पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ व समाजाचा आरसा असणाऱ्या पत्रकार बांधवांच्या हस्ते श्रीं ची आरती करण्यात आली.
एका जन्मजात अंध असणाऱ्या.. वाचता लिहिता येत नाही.. फक्त आणि फक्त श्रवण करून.. किर्तन करण्याची कला ज्यांनी जोपासली असे प्रसिद्ध अंध कीर्तनकार.ह भ प श्री. मुळे महाराज (सांगलीवाडी.) यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
समाजातील निराधार निराश्रीत वंचित व भटक्या आणि अनाथ मुलांसाठी सुद्धा. अशा या उत्सवामध्ये सहभागी व्हावेत यासाठी प्रतिनिधींच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.तसेच अनाथाश्रम.. वृद्धाश्रम. मूकबधिर. यांच्या प्रतिनिधींना श्रींच्या समोर अथर्वशीर्ष पठण करून सत्यनारायण पूजा व प्रसाद वाटप करण्यात आला. या गणेश उत्सवामधून समाज प्रबोधन व्हावे.यासाठी स्वतःचा आणि देशाचा इतिहास विसरता कामा नये..म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज.आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. या दोन्ही महापुरुषांचे कार्यकर्तृत्व आणि बलिदान या विषयावर..
प्रसिद्ध वक्ते. सुनील लाड यांचे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले.तसेच आपल्या जीवाची परवा न करता.. कोरोना सारख्या महाभयंकर काळामध्ये ज्यांनी कोणताही स्वार्थ. हेतू.अमिष न बाळगता. फक्त मानव जात जगली पाहिजे.असा दृढ निश्चय करून ताकतीने सेवा देणाऱ्या आरोग्य विभागातील आरोग्य सेविका आरोग्य सेवक.आणि वैद्यकीय क्षेत्रातील ज्यांना आपण देव म्हणतो.असे डॉक्टरर्स यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.याचबरोबर पृथ्वीचा समतोल राहावा... पर्यावरण जनजागृती व्हावी.. प्रदूषण कमी व्हावे. एक घर एक झाड.. प्रत्येकाने वृक्षारोपण करावे यासाठी एक संकल्प सोडण्यात आला. व वृक्षाची रोपे वाटण्यात आली.. महिला सक्षमीकरण. व
महिलांची होत असलेली पिळवणूक.या विषयावर जागृती करून. महिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
नेहमी सामाजिक सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहणाऱ्या रोटरी क्लब ऑफ शिरोळ रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ लायन्स क्लब शिरोळ या संस्थेच्या प्रतिनिधींच्या हस्ते. श्रीं ची आरती करण्यात आली.
गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक म्हटली म्हणजे.. छाया मिरवणुकीमध्ये डॉल्बी.. बँड ढोल.. असे अनेक ध्वनी प्रदूषण करणारी साहित्य आपल्याला कानावर पडून माणसंच आरोग्य धोक्यात येत असते... गणरायाला निरोप देताना... शांततामय निरोप न देता धांगडधिंग्याच्या वातावरणात सद्यस्थितीला निरोप देण्याची पद्धत आलेली आहे.. आणि या सर्वालाच फाटा देऊन...
एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असताना
आपल्या माता भगिनींनी मराठमोळा साज आणि कोल्हापुरी फेटा व पारंपारिक वेशभूषा परिधान करून. या मिरवणुकीत सहभाग घेतला देव म्हटलं की पालखी आली... आणि अशाच पानाफुलानी सजवलेली सर्वांग सुंदर अशी श्रीं ची पालखीसमोर भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी.. मृदंग टाळ. यांचे लयबद्ध तालाच्या स्वरात. श्री गणरायाच्या नामघोशात.जय जयकारात... महिलांच्या खांद्यावर पालखी देऊन.विसर्जन सोहळा संपन्न केला.अशा या भक्तिमय.. वातावरणात उत्सव साजरा केला शिरोळ नगरीचे लक्ष वेधून घेणारा सामाजिक उपक्रम राबवणारा लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील गणेश उत्सव. येथील बाजारपेठ गणेश उत्सव मंडळाने साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला