कुमार दानोळी नं.२च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी प्रशांत शशिकांत चंदोबा व उपाध्यक्षपदी राजश्री सुयश कुलकर्णी यांची निवड.
दानोळी :
दानोळी येथील कुमार विद्या मंदिर दानोळी नंबर २ शाळेत सन २०२३ ते २०२५ या दोन वर्षासाठी नूतन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी प्रशांत शशिकांत चंदोबा व उपाध्यक्षपदी राजश्री सुयश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.यावेळी शाळेत पालक मेळावा घेण्यात आला.
पालक मेळाव्यात सर्व संमतीने पुढील पालकांची सदस्य पदी निवड करण्यात आली.प्रियंका उत्तम पिसे,भाऊसो भिमराव वाळकुंजे,सन्मतीकुमार बाळासो बिनीवाले,खुशबू अल्ताफ नदाफ,महादेव तुकाराम गावडे, रूपाली जगदीश संकपाळ, रोहित भरत तवंदकर,निलम विजय कलाल,
ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी म्हणून उपसरपंच विपूल भिलवडे,तज्ञ मार्गदर्शक मुरलिंग क्षीरसागर गुरूजी,शिक्षक प्रतिनिधी म्हणून सुनंदा नलवडे,विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत ठोंबरे,विद्यार्थीनी प्रतिनिधी आदिती चव्हाण,सचिव पदी प्रभारी मुख्याध्यापिका कौशल्या रविंद्र शेटके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.यावेळी दानोळी च्या सरपंच सुनिता वाळकुंजे, उपसरपंच विपुल भिलवडे,ग्रामपंचायत सदस्या सौ.बोरचाटे उपस्थित होते.
यावेळी सरपंच सुनिता वाळकुंजे यांनी शाळेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.तसेच नूतन अध्यक्ष,उपाध्यक्षा व सर्व सन्माननीय सदस्य यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. उपसरपंच विपुल भिलवडे यांनी सर्वाचे अभिनंदन केले.
मावळते अध्यक्ष अभय वाळकुंजे,उपाध्यक्षा रेखा बिनीवाले व मागील सर्व कमिटीचा यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी पवनकुमार आलमाने व मुरलिंग क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.स्वागत कौशल्या शेटके यांनी केले.सूत्रसंचालन विजय भोसले यांनी तर आभार स्वाती भोसले यांनी मानले.