Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

सदलगा शहरात ज्येष्ठा गौरी आवाहन मोठ्या उत्साहात व वाद्यांच्या गजरात संपन्न.

 सदलगा--


महाराष्ट्र व कर्नाटक या सीमा भागात गणपती उत्सवा दरम्यान भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे आवाहन प्रत्येक घरामध्ये होते.

गौरीच्या आगमनाने प्रत्येक कुटुंबामध्ये संपत्ती, सुख, शांती, आरोग्य धनधान्य व समृद्धी भरभरून येते ,ते गौरीच्या पावलाने येते असे मानले जाते. म्हणून सर्व घरांमध्ये गणेशोत्सवा दरम्यान ज्येष्ठा गौरीची मनोभावे पूजा केली जाते. देवी गौरी या गणेशाची आई पार्वतीचे दुसरे नाव आहे. आज सर्व शहरात मोठ्या उत्साहात स्त्रियांनी सहभाग घेऊन गौरी गणपतीची गाणी म्हणत, ढोल ताशांच्या गजरात ज्येष्ठा गौरीचे आगमन संपूर्ण शहरांमध्ये झालेले पहावयास मिळाले. यामध्ये लहान मुली, मोठ्या युवती व स्त्रियांचा  समावेश प्रामुख्याने दिसून आला. सर्वत्र आनंदी व हर्षभराने व्यापून राहिलेले वातावरण दिसत होते.