Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

सदलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था

 सदलगा --


 सदलगा ता. चिकोडी येथील  सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी असणाऱ्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था दयनीय, अनेक गैरसोयीनी ग्रासलेली प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र.

 सदलगा हे शहर सर्वात मोठे असून या शहराची व आजूबाजूच्या या आरोग्य केंद्राशी संलग्न असलेल्या खेड्यांची लोकसंख्या पाहता अंदाजे 35 ते 40 हजार असून या सदलगा प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त एक वैद्यकीय अधिकारी व त्यांना मदतीसाठी अत्यंत कमी सहाय्यक कर्मचारी असून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आरोग्याला प्रथम प्राधान्य देणाऱ्या शासनाने या शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पूर्णतः दुर्लक्ष का केले आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. यामुळे या सदलगा शहरातील व आजूबाजूच्या खेड्यातील लोकांना वैद्यकीय सेवा योग्य पद्धतीने मिळणे अत्यंत अवघड झाले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्गाची अनेक निवासी संकुले नादुरुस्त व नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, आणि त्यातीलच काही निवासी संकुलामध्ये आपल्या घरावर ताडपत्री लावून जीवन जगताना कर्मचारी दिसत आहेत, अचानक काही आपत्ती घडली, इमारत पडली तर याला जबाबदार कोण?

याकडे संबंधित खात्याचे लक्ष कसे नाही ?असा प्रश्न सदलगा शहरातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे. परंतु याकडे अधिकारी व प्रशासन दोघेही कानाडोळा करीत आहेत ,यामागे राजकारण काय हेच सदलगा येथील जनतेला कळेनाशी झाले आहे. परंतु येथूनच जवळ असलेल्या आणि सदलगा शहराच्या तुलनेने कमी लोकसंख्या असलेल्या राजकीय नेत्यांच्या गावी मात्र मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असून वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपलब्धता देखील अपेक्षेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे सदलगा शहरासाठी दुजाभाव का केला जातो? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

आरोग्य केंद्राच्या बाहेर लाखो रुपये खर्चून आणलेला जनरेटर उघड्यावर पडला आहे, या ठिकाणी रुग्णांसाठी रुग्णवाहिका असून त्याला चालक नाही .यामुळे सदलगा प्राथमिक आरोग्य केंद्र "असून अडचण नसून खुळांबा" अशी अवस्था झाली आहे. तरी संबंधित खात्याने याकडे त्वरित लक्ष देऊन येथील पडझड झालेली सर्व कर्मचारी निवासी संकुलांची त्वरित दुरुस्ती करावी, कर्मचाऱ्यांना चांगल्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, त्याचबरोबर शहरातील व आजूबाजूच्या खेड्यातील नागरिकांना अत्यंत चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली जात आहे.

 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील सर्व दयनीय अवस्थेतील कर्मचाऱ्यांच्या संकुलाची दुरुस्ती किंवा नूतन बांधणीचा प्रस्ताव या शहराशी संबंधित असणाऱ्या  खासदार व  आमदार  यांनी त्वरित लक्ष घालून त्या सोयी या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सदलगा शहरातील जनतेतून जोर धरीत आहे.