Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

सदलगा केदारनाथ सायकल प्रवासासाठी रवाना

 सदलगा


 येथील  सर्व युवकांसमोर आणि समाजासमोर एक नवा आगळावेगळा आदर्श  ठेवीत कर्नाटक सदलगा ते उत्तराखंड केदारनाथ असा 2200 किलोमीटरचा प्रवास सायकलने करण्यासाठी मोठ्या उत्साहात समारंभपूर्वक रवाना.

सायकल चालवा आरोग्य सुदृढ ठेवा,

 सायकल चालवा इंधन वाचवा .

तरुणांनो सावध व्हा अनेक व्यसनापासून दूर राहा, आरोग्याची काळजी घ्या आणि जिद्दीने नवा पराक्रम करा.

याबरोबरच युवकांनो  नवा छंद जोपासा व्यसना पाठीमागे न जाता वेगळेपण काहीतरी करून दाखवा. 

या उद्देशाने सदलगा शहरातील तरुण प्रवीण अण्णाप्पा मडिवाल हा सायकलने सदलगा ते उत्तराखंडातील केदारनाथ अशा प्रवासासाठी आज  रवाना झाला.अलीकडील युगामध्ये तरुण पिढी दिशाहीन आणि दशाहीन होत असताना फक्त मोबाईलच्या मोह जनंजाळात सापडलेला असताना ,

सदलगा शहरातील अण्णाप्पा ईश्वर मडिवाळ यांचे चिरंजीव कुमार प्रवीण अण्णाप्पा मडिवाळ वय वर्षे 23 या युवकाने आपलं आय टी आय पूर्ण करून आपण समाजाला एक नवीन संदेश द्यावा, समाजाची बांधिलकी जोपासावी या उदात्त हेतूने आज तो युवक सदलगा ते केदारनाथ अशा एका मोठ्या प्रवासासाठी सायकलवरून निघाला, याचे सर्वत्र कौतुक होत आहे .

छंद असावा तर असा असे त्याला शुभेच्छा देण्या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या तोंडातून  उद्गार निघाले. त्याच्या या प्रवासासाठी सदलगा शहरवासी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!