Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

कन्या घोसरवाड शाळेची शिक्षणाबरोबरच सर्व क्षेत्रात भरारी : रोटरी अध्यक्ष सारंग बाळंखे

घोसरवाड :


 कन्या विद्या मंदिर घोसरवाड शाळा शिक्षणाबरोबरच खेळ, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात शाळेने भरारी मारली आहे.विद्यार्थिनीच्यांत उत्साह,शिस्त व आत्मविश्वास दिसून येतो.याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन व शुभेच्छा.असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ पुणे विझडम प्रेसिडेंट रो.सारंग बाळंखे यांनी केले.कन्या विद्या मंदिर घोसरवाड शाळेसाठी रोटरी क्लब ऑफ पुणे विझडम मार्फत ८९,००० रुपयांच्या इयत्ता १ली ते ३री च्या वर्गासाठीच्या ५२ बेंचेस प्रदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच साहेबराव साबळे होते.

          दत्तवाडचे सरकार श्रीमंत भवानीसिंग घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नाने शाळेच्या रुफकामासाठी दै.सकाळ रिलीफ फंडामार्फत ५ लाख रुपये श्रीमंत महेंद्रसिंग पिसाळ व राहूल गरड यांचे सहकार्याने प्राप्त झाले होते व  बेंचीससाठी ८९,००० रुपये रोटरी क्लब अॅफ पुणे विझडम यांचेकडून मिळविले.याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले.यावेळी बोलताना ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळांत शेतकरी, शेतमजूर,कामगारांची सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिकत आहेत. त्या विद्यार्थांनाही उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी शिक्षणाच्या चांगल्या सोई प्राप्त करुन दिल्या पाहिजेत. देश ग्रामीण भागात लपलेला आहे.समाजसेवी संस्थांनी शाळा दत्तक घेवून जिल्हयातील पहिल्या १० शाळांमध्ये या शाळेचा समावेश व्हावा अशी विनंती करतो. पुण्याहून इतके लांब येवून ग्रामीण भागातील शाळेसाठी मदत केली याबद्दल ऋणी आहे. इथले विद्यार्थी उच्च पदांवर पोहचतील असे चांगले विद्यार्थी घडतील अशी अपेक्षा ठेवतो.

             जानकी वृद्धाश्रमचे संचालक डॉ.बाबासाहेब पुजारी म्हणाले,कन्या शाळेने सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी केलेली आहे.शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.संगणक लॅबसाठी ३ संगणक देण्याचे जाहीर केले.

          कन्या शाळेस भरघोस मदत केल्याबद्दल ग्रामपंचायत घोसरवाड मार्फत रोटरी अध्यक्ष रो.सारंग बाळंखे यांचा सत्कार सरपंच साहेबराव साबळे व माजी सरपंच मयूर खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या वतीने श्रीमंत भवानीसिंह घोरपडे यांच्या मार्फत सत्कार संपन्न झाला.

          शाळेच्या विद्यार्थिनींनी लेझीम पथक व स्वागत गीतांनी स्वागत केले.बहारदार नृत्य व मनोगतांनी पाहुण्यांना भारावून टाकले.शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

      या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ पुणे विझडम चे डायरेक्टर राजेश वाडेकर,मेंबर डायरेक्टर पब्लिक इमेज राजेंद्र देशपांडे, पास्ट प्रेसिडेंट हेमंत पुराणिक, प्रा.बाळसिंग मिसाळ,शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे,सुरचंद घुडाके,जयसिंग वडर,प्रदिप पाटील,शिवाजी भोसले, तुकाराम पाटील,सुभाष कांबळे, कुमार मुरगुंडे,दिपाली पुजारी, भाग्यश्री भिर्डे,जयश्री नंदिकुरळे,रमेश मारुती कोळी, विद्याधर मोकाशी,सहदेव माळी,गुंडा परीट,ज्योती परीट,राजू ढोणे उपस्थित होते.

               केंद्रीयप्रमुख तथा मुख्याध्यापक रमेश शंकर कोळी यांनी प्रास्ताविकात शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला.स्वागत शामराव कांबळे यांनी तर आभार मुख्याध्यापक दत्तात्रय कमते यांनी केले.सूत्रसंचलन दिलीप शिरढोणे यांनी केले.़