कै. डॅा.रामचंद्र विठ्ठल फडणीस व कै. सौ. जानकीबाई रामचंद्र फडणीस प्राथमिक विद्या मंदिर येथे तृणधान्य पाककृती स्पर्धा संपन्न
दत्तवाड (प्रतिनिधी):---
शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडच्या कै. डॅा.रामचंद्र विठ्ठल फडणीस व कै. सौ. जानकीबाई रामचंद्र फडणीस प्राथमिक विद्या मंदिर कुरुंदवाड (ता.शिरोळ) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत माता पालकांसाठी तृणधान्य पाककृती स्पर्धा घेण्यात आली.
य तृणधान्यापासून बनवलेले पदार्थ जसे गहू, भात, मका, राय, ओट, सातू, ज्वारी आणि ज्वारी वर्गातील पिके, बाजरी, नाचणी, वरी, राळा, सावा, कोद्रा व बंटी अशा तृणधान्यापासून तयार केलेले एक पदार्थ बनवून शाळेत घेऊन आले होते . ठरवून दिलेल्या जागी त्याची मांडणी करुन कागदावर त्या पदार्थाची पौष्टिकता व त्याची कृती लिहून आणले होते. त्या पाककृतीची रेसिपी व पौष्टिकता याबद्दल परीक्षकांना माहिती सांगितली.
एस. पी.हायस्कूलच्या अध्यापिका के. आर. पाटील व आर. ए.गुळवणी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन .प्रा.शरदचंद्र पराडकर यांची प्रेरणा व स्फूर्ती मिळाली तर संस्थेच्या सेक्रेटरी सीमा जमदग्नी व विश्वस्त श्रद्धा कुलकर्णी उपस्थित राहून पदार्थांची चव घेऊन पालकांचे कौतुक केले.
या शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी काळे , कांचनमाला बाबर, विद्यासागर उळागड्डे , अनिल पांडव, दत्तात्रय कुरुंदवाडे , अनिता भोई , मिरामा बाणदार, सुनील पवार , मालूताई गुरव,बहुसंख्येने पालक उपस्थित होते.