श्री लक्ष्मी ग्रामीण पतसंस्थेत सभासदांच्या हितालाच प्राधान्य -चेअरमन बबन चौगुले
दत्तवाड -
कर्जदारांबरोबरच यावर्षीपासून सभासदांचा दोन लाखाचा अपघाती विमा संस्थे मार्फत केला जाणार असून सभासदांचे हित जोपासण्यात संचालक मंडळ कमी पडणार नाही त्यांनी अठरा वर्षे संस्थेवर ठेवलेला विश्वास आम्ही साथ करणार असे उद्गगार चेअरमन बबनराव चौगुले यांनी काढले .
श्री लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था दत्तवाड च्या येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार सभागृहात झालेल्या आठव्या सर्वसाधारण वार्षिक सभेत बोलत होते .
या आर्थिक वर्षात वार्षिक उलाढाल एकोणपन्नास लाख ऐक्यानव हजार रूपये झाली असून सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे. ठेवी सात कोटी शहात्तर लाख आठ्ठयाऐशी हजार रुपये असून कर्ज चार कोटी एकोणतीस लाख एकोणीस हजार रुपये आहे. तर खेळते भांडवल दहा कोटी ऐक्कावन लाख त्रआहत्तर हजार रुपये एवढे आहे.
प्रथम दिपप्रज्वलन सद्गुरु बाबा महाराज मठाचे मठाधीश ऋषिकेश आनंद महाराज यांच्या हस्ते झाले .
यावेळी गावातील विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या व पुरस्कार मिळवलेल्या नागरिकांचा व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी अजित वठारे, शशिकांत जोशी, भरमगोंडा पाटील दानवाड ,सुभाष शिरहट्टी, मिलिंद देशपांडे. यांनी मनोगते व्यक्त केली.
पतसंस्थे चे मॅनेजर मल्लिनाथ कल्याणावर यांनी सभेपुढील विषय व अहवालाचे वाचन केले. उपस्थित सर्व सभासदांनी सभी पुढील विषयाला एकमताने मान्यता दिली.
यावेळी संचालक सक्काण्णा सिदनाळे,प्रकाश पाटील, देवेंद्र चौगुले शशिकांत सूरवशी, कुमार कुंभार महादेव पवार, रामचंद्र बिरणगे, आण्णासो पाटील ,अशोक पाटील, प्रकाश पिरगौडा पाटील, यांच्यासह सुकुमार सिदनाळे अजित चौगुले अशोक नेर्ले ,शांताराम हिमगिरे , ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील , जीवन शिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, नरसिंह सरस्वती महिला दूध संस्था, श्री समर्थ सह.दूध संस्था चे पदाधिकारी यांच्यासह सभासद उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक सूर्यकांत चौगुले यांनी केले.