पालिका कर्मचारी दिन उत्साहात साजरा
सदलगा --
कर्नाटक राज्य नगरपालिका कर्मचारी सेवा संघ बेंगलोर शाखा सदलगा आणि सदलगा नगरपालिका सदलगा कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने "पालिका कर्मचारी दिन " आज कल्याण मंडप सदलगा येथील मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरातील सदलगा नगरपालिका कर्मचारी संघाची नगरपालिका कर्मचारी दिन आज कल्याण मंडप मंगल कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष श्री संजीव गुडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
प्रारंभी कर्मचारी दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन नगरपालिका महिला कर्मचारी वर्गांच्या हस्ते छोट्या वृक्षाला पाणी अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व महिला सबलीकरणाचे महत्त्व समाजाला दाखवून दिले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर माजी नगराध्यक्ष अभिजीत पाटील, नगरसेवक रवी गोसावी, बसवराज हनबर, आनंद पाटील, भीमराव माळगे ,हेमंत शिंगे, माजी नगरसेवक राजू अमृतसंम्मनावर, कैलास माळगे, सुनील नंदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष नवले, अभिनंदन पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या नगरपालिका कर्मचारी दिनानिमित्त कर्मचारी वर्गामार्फत नुकत्याच क्रीडा स्पर्धा कर्मचारी वर्गाच्या घेण्यात आल्या, त्यामध्ये कबड्डी, धावणे, क्रिकेट, हॉलीबॉल, लिंबू चमचा ह्या स्पर्धा घेण्यात घेण्यात आल्या. त्या संघातील विजय स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमांतर्गत सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात संजीव गुडे यांनी कर्मचारी वर्गाच्या समस्या, सुख सोयी, मिळणाऱ्या सवलती, इतर सर्व प्रश्नावर चर्चा करून नगरपालिकेतील जे अस्थायी कर्मचारी आहेत त्यांना लवकरच कायमस्वरूपी कर्मचारी करून घेण्यासाठी संघटना प्रयत्न करेल असे सांगितले. त्याचप्रमाणे कर्मचारी भवन याचे काम देखील लवकरच सुरू होणार असून पुढील वर्षाची सभा नूतन इमारतीमध्ये होईल असे यावेळी त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास उपाध्यक्ष प्रवीण गर्दाळ, प्रभारी मुख्याधिकारी श्री एल व्ही मधाळे, शाखा सचिव एम बी गवंडी, संघटना सचिव कृष्णा बागडी व विजय कोकणे, संघटना अधिकारी मोहन राजापुरे, कर्मचारी श्रीमती सविता करवीरे, सौ शामला माळगे, सौ सुनीता मोरे, श्रीमती कलावती असूदे, श्रीमती शोभा ब्याळे, शहरातील अभियंता श्री महेश बागणे, श्री कमते श्री हट्टी इत्यादी सह अनेक पत्रकार व शहरातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय कोकणी यांनी केले तर समारोप व आभार प्रदर्शन मोहम्मद अली गवंडी यांनी केले.