पर्यावरण पूरक गौरी गणपतीची स्थापना करत समाजाला दिला अनोखा संदेश
सैनिक टाकळी( प्रतिनिधी)
येथील संध्या महादेव पाटील यांनी पर्यावरण पूरक गौरी गणपतीची स्थापना करत समाजाला एक वेगळा संदेश दिला आहे.सण उत्सव साजरे करताना प्रदूषण मुक्त साजरे करून सामाजिक प्रबोधन करता येते हे त्यांनी आपल्या कल्पकतेने दाखवून दिले आहे.
सामाजिक बदल हा विचारांच्या बदलांनी घडतो. विचार बदलले की कृती बदलते.काळाच्या ओघात उत्सव साजरे करण्याची पद्धत बदलत गेली, जसजसा काळ पुढे गेला तसतसा हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा कसा करावा, याची चढाओढ निर्माण झाली. माझी मूर्ती जास्त भव्य, आकर्षक असावी, असं प्रत्येकाला वाटू लागलं. या संघर्षात माती आणि शाडूच्या मूर्तीची जागा प्लॅस्टर ऑफ पॅरिसने केव्हा घेतली, हे कधी समजलेच नाही. परिणामी प्रदूषणासारख्या समस्या उद्भवू लागल्या. यासाठी शासन स्तरापासून स्वंयसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या स्तरावरून पर्यावरण पूरक उत्सव साजरे करण्यासाठी प्रबोधन करू लागले.दरम्यान संध्या पाटील यांनी देखील गौरी गणपती उत्सव साजरा करत असताना या सर्व बाबींचा विचार करून पर्यावरण पूरक मूर्तीचा वापर केला आहे. याचबरोबर सेंद्रिय शेतीचा वापर, मराठी शाळांचे अस्तित्व टिकवणे, मुलांची कर्तव्ये, प्रदूषण,
व्यसनाचे परिणाम, कँसर, अशा अनेक गोष्टी बाबतीत देखाव्यातुन जनजागृती केली आहे.