Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

बालरोगतज्ञ डॉ अतुल पाटील राज्यस्तरीय धन्वतरी गौरव पुरस्काराने सन्मानित

शिरोळ : प्रतिनिधी : 


 सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अविष्कार या सेवाभावी संस्थेच्या वतीने शिरोळ मधील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ अतुल पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय धन्वंतरी गौरव हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. अविष्कार सामाजिक संस्थेच्या वतीने  यशोदत्त मंगल कार्यालय बागणी (ता वाळवा) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. 

बालरोगतज्ञ डॉ अतुल पाटील गेल्या ९ वर्षांपासून आपल्या मातोश्री चाईल्ड क्लिनिकच्या माध्यमातून अहोरात्र आरोग्य सेवा देत आहेत. गेल्या ४ वर्षांपूर्वी जगाभरात ओढवलेल्या करोना महामारीच्या संकटात त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लहान मुलांचे मोफत कोविड सेंटर चालू केले होते. रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ व डॉक्टर्स असोसिएशनचे ते सदस्य असून दोन्ही संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात. डॉ अतुल पाटील यांनी त्यांचे मूळ गावी कै. राजाक्का पाटील मोफत स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व मार्गदर्शन केंद्र   तसेच शिरोळ येथे वसंतपुष्प मोफत  स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व मार्गदर्शन केंद्र चालवीत आहेत. मातोश्री चाईल्ड क्लिनिक च्या माध्यमातून मुलींच्या तपासनी फी मध्ये सवलत ; मोफत तपासणी शिबीरे ;  प्रज्ञाशोध परीक्षा ; सदृढ बालक स्पर्धा ;  हस्ताक्षर स्पर्धा घेऊन मुला - मुलींच्या आरोग्याची काळजी घेतात व शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्नशील असतात. डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून दरवर्षी आषाढी वारी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांची आरोग्यसेवा करीत असतात.  शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुला - मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावतात.  डॉ अतुल पाटील यांच्या वैद्यकीय ; सामाजिक - सांस्कृतिक ; शैक्षणिक क्षेत्रातील योगदान पाहून कोल्हापूर येथील अविष्कार सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय धन्वतरी  गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  प्रा  किसनराव कुऱ्हाडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार ; सदस्य उमेश पाटील तसेच परिसरातील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.