आंदोलन अंकुश ची 9 नोव्हेंबर ला एल्गार सभा*
दत्तवाड -
ऊस दराच्या प्रश्नावर आंदोलन अंकुश संघटनेची यावर्षीची एल्गार सभा 9 नोव्हेंबर रोजी शिरोळ च्या छत्रपती शिवाजी चौकात होणार आहे
ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवून ते प्रश्न सरकार दरबारी व प्रसंगी कोर्टात मांडून ते मुळापासून सोडवणे हा आमच्या संघटनेचा नेहमीच प्रयत्न असतो त्याचबरोबर उसाला दुसरा हप्ता 500 रुपये मिळावा व येत्या हंगामात पहिली उचल एकरकमी 3500 मिळावी ही मागणी आम्ही गेली 4 महिने लावून धरली आहे पण कारखाने जुमानायला तयार नाहीत कारखान्यांच्या विरोधात आता आरपार ची लढाई करावी लागणार आहे त्याची दिशा आणि धोरण काय असावे हे एल्गार सभेत शेतकऱ्यांच्या संमतीने ठरवले जाणार आहे.
*काट्याने काटा काढला*
उसाच्या वजनातील काटामारी रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालकीचा काटा आम्ही घोषणा केल्याप्रमाणे उभा केला आहे तो या हंगामात शेतकऱ्यांच्या उसाचे वजन करण्यास उपलब्ध होऊन कारखानदारांच्या काटामारी वर शेतकऱ्यांच्या काट्याने त्यांना आम्ही उत्तर दिले असून या भागातील काटामारी चा विषय मुळातून सोडवला आहे.
*1 नोव्हेंबर ला मोटर सायकल रॅली*
या वर्षीचा हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा सरकार चा मानस आहे आपल्या भागातील कारखाने पण त्याच दरम्यान सुरु होतील उसाचा दुसरा हप्ता दिल्याशिवाय व पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखाण्याच्या तोडी घेऊ नका हे सांगण्यासाठी 1 नोव्हेंबर ला आम्ही शिरोळ तालुक्यात मोटर सायकल रॅली काढणार आहे