रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान: प्रिन्स जिंदाल एचपीसीएल कोल्हापूर डीलर वेलफेअर सोसायटी यांच्यावतीने टारे पेट्रोल पंप येथे रक्तदान शिबिर व स्वच्छता अभियान संपन्न
शिरोळ /प्रतिनिधी :
रक्तदान हे श्रेष्ठदान असुन रक्तदानामुळे कोणाचा तरी एकाद्याचा जीव वाचू शकतो यासाठी आपण सर्वानी सहकार्य करून रक्तदान शिबीरास प्रोत्साहन देण्याची गरज आहे . तसेच स्वछतेची सुरवात स्वतःपासुनच करा कचर्याची योग्य विल्हेवाट लावून आपला परिसर स्वच्छ ठेवा कचरा उद्यड्या वरती फेकु नका आपल्या घरातील सांडपाणी रत्यावरती सोडू नका असे आवाहन हिंदूस्थान पेट्रोलीयमचे रिझनल मॅनेजर प्रिन्स जिंदाल (गोवा)यांनी केले . एचपीसीएल आणि एचपीसीएल कोल्हापूर डीलर वेलफेअर सोसायटी यांच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत फॉर ह्युमनिटी (हमारी पहल) या उपक्रमांतर्गत शिरोळमधील टारे पेट्रोल पंप येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला तसेच शिरोळ पोलीस ठाणे , तहसिल कार्यालय परिसरात एक दिन एक तास या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .
महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून शिरोळ नगर परिषदेच्यावतीने शिरोळ शहर व बुवाफन मंदिर छत्रपती शिवाजी तक्त पंचगंगा नदी घाट कल्लेश्वर मंदिर कलेश्वर तलाव तहसिल कार्यालय परिसर या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्यात आली या ठिकाणी एचपीसीएलचे सर्व अधिकारी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अधिकृत विक्रेते डीलर यांनी सहभाग घेतला .
शिरोळ पोलीस ठाणे येथे पोलीस निरिक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, उपनिरिक्षक विश्वास कुरणे, आर . पी . ओमासे, यु . पी . खरात , प्रताप सरनाईक , बाबालाल पटेल ' यांच्या सह कर्मचारी अधिकारी व एचपीसीएल कोल्हापूर डीलर वेलफेअर सोसायटी यांच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच एचपीसीएलच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना स्कूल ब़ँगचे वाटप करण्यात आले तहसिल कार्यालय येथे स्वच्छता मोहिम अभियान बाबतची शपथ घेण्यात आली यावेळी प्रांताधिकारी मौसमी चौगुले, तहसिलदार अनिलकुमार हेळकर, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव , हिंदूस्नान पेट्रोलियमचे रिझनल मॅनेजर प्रिन्स जिंदाल , विभागीय अधिकारी आदित्य अग्रवाल , अविनाश टारे , अशोकराव टारे सौ स्नेहल टारे जकुमार माणगांवे , हर्षद माणगांवे , विजय खांबे, योगेश रायनाडे , नंदू इंगवले, संजय केसरकर रणजीत जाधव राजू जाजल यांच्यासह सर्व डीलर्स उपनगराध्यक्षा सौ. करुणा कांबळे,नगरसेवक तातोबा पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश गावडे, सर्जेराव पुंदे, यांच्यासह नगरषरीद कर्मचारी अधिकारी तहसिल कायलियातील कर्मचारी अधिकारी यांच्यासह नागरीकांनी सहभाग घेतला . टारे पेट्रोल पंपाचे संचालक अतुल टारे यांनी स्वागत केले पत्रकार डी आर पाटील यांनी आभार मानले