शिरोळ तालुक्यात "एक तारीख एक तास श्रमदान" उपक्रम संपन्न.
शिरोळ :
शालेय विभाग, भारत सरकार यांनी निर्देशित केलेनुसार दि. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३या कालावधीत संपूर्ण देशामध्ये स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून एक भाग म्हणून "एक तारीख एक तास श्रमदान" हा उपक्रम प्रत्येक वाडी,वस्ती, गाव,शहर यामध्ये राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. प्रत्येक शाळेमध्ये शालेय परिसर, शाळेजवळील परिसर, ग्रामपंचायत स्तरावर विविध भागामध्ये सामूहिक स्वच्छता करणेसाठी एक तास श्रमदान कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले होते.त्यानुसार शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत व शाळा स्तरावर सदरचा उपक्रम राबविणेत आला.
सदर उपक्रम राबविणेसाठी गटविकास अधिकारी शंकर कवितके,सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदिप पाटील,गट शिक्षण अधिकारी भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,अनिल ओमासे यांचे बरोबरच तालुक्यातील पंचायत समिती स्तरावरील सर्व अधिकारी,कर्मचारी, सरपंच,सदस्य,ग्रामस्थ,केंद्रीय प्रमुख,मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.
दरम्यान ग्रामपंचायत मौजे आगर या ठिकाणी तालुकास्तरावरील मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात गटविकास अधिकारी शंकर कवितके,सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप पाटील, तालुका आरोग्याधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर,गट शिक्षण अधिकारी भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,अनिल ओमासे,संजय पाटील यड्रावकर,सरपंच अमोल चव्हाण,ग्राम पंचायत सदस्य,पंचायत समिती स्तरावरील सर्व अधिकारी,कर्मचारी,मुख्याध्याक,शिक्षक,अंगणवाडी सेविका, विद्यार्थी उपस्थित होते.