Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

सदलगा शहरात मोठ्या उत्साहात गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत "स्वच्छता अभियान "मोठ्या जनसमुदायाच्या सानिध्यात आज संपन्न.

 सदलगा -


सदलगा शहरात मोठ्या उत्साहात गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत "स्वच्छता अभियान "मोठ्या जनसमुदायाच्या सानिध्यात आज संपन्न.

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 पर्यंत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत "स्वच्छता अभियान" सदलगा येथे सदलगा नगरपालिका सदलगा ,राष्ट्रीय आपदा मोचना बल,( नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्या आणि शहरातील 

नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने सदलगा नगरपालिका सदलगा येथील पाणीपुरवठा केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रारंभी श्रीयुत अनिल कुमार डेक्कनवर यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा सर्वांना दिली. आणि आपला परिसर आपण स्वच्छ कसा ठेवावा, सुंदर शहर स्वच्छ शहर यावर आपले सविस्तर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सदलगा शहरातील जेष्ठ पत्रकार श्री. अण्णासाहेब कदम यांनी 'एक तास स्वच्छतेसाठी' आणि "स्वच्छता हीच सेवा" या संदेशामार्फत स्वच्छतेचे महत्व विशद केले.

 आरोग्यासाठी स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे उदाहरणाद्वारे या वेळेला विशद केले. 

याप्रसंगी सदलगा शहराचे प्रभारी मुख्याधिकारी श्रीयुत एल व्ही मधाळे, हेल्थ इन्स्पेक्टर पी बी गर्दाळ, संजीव गुडे ,एम बी गवंडी, कृष्णा बागडी, जी एस कांडेकर, रुपेश करंगळे, बी एस हिरेमठ, विजय पाटील, शिवराज पकाले, विजय कोकणे यांनीही स्वच्छतेच्या घोषणा व स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. आणि स्वच्छता अभियानाला सर्वांच्या उपस्थितीत चालना देण्यात आली.

शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांसह जलपुरवठा केंद्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान कार्यक्रम सर्व ग्रुपने मिळून राबविण्यात आले. स्वच्छता अभियाना प्रसंगी एन डी आर एफ टीम 10 चे कमांड इन्स्पेक्टर पी रोबिनकुमार, हेड कॉन्स्टेबल त्यागराजन, पवन राज, आदिनारायण सहकारी मल्लिकार्जुन, नाईक, रेड्डी, विठ्ठल, सरोज इत्यादी एन डीआर एफ चे कर्मचारी उपस्थित होते.

नगरपालिका स्वच्छता कर्मचारी सविता करवीरे, शामला माळगे, सुनिता मोरे, कलावती असूदे,

अंगणवाडी सेविका विजया नवले, शकुंतला नवले, गीता निंबाळकर, सरोजिनी वराळे, सुमित्रा घोबडे, अनुसया मेळाले, शशिकला अनुरे, अनिता भावके, अनिता पुजारी, गौरी हुगार, नशिमा खान, संगीता मंडोळे इत्यादी सह शहरातील अनेक मान्यवर व  नागरिक उपस्थित होते.