Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांच्या कौशल्य गुणांना वाव मिळण्यासाठी कार्यशाळेची गरज : डॉ अरविंद माने शिरोळत शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला कार्यशाळा उत्साहात

शिरोळ : प्रतिनिधी : 


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात सेवा पंधरवाड या कार्यक्रमांतर्गत  भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर ग्रामीण पूर्व व शिरोळ तालुका भारतीय जनता पार्टी तसेच षडंग सोसायटी ऑफ आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सौ. रुक्मिणी पांडुरंग माने (रहिमतपूरकर) कन्या महाविद्यालय येते दोन दिवसीय शासकीय एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला स्पर्धेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेत माने कन्या.विद्यालय, शिरोळ, न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर, न्यू इंग्लिश स्कूल शिरोळ, ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल शिरोळ, जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल जयसिंगपूर ,जनता हायस्कूल शिरोळ अशा विविध विद्यालयातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते सहभागी विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांच्याकडून एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट यातील सर्व विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले कार्यशाळेमधील सहभागी विद्यार्थ्यांच्या अल्पपोहाराची सोय करण्यात आली होती तसेच निवडक उत्कृष्ट अशा२५ चित्रांना विशेष पुरस्कार व बक्षीस वितरण या कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर ग्रामीण -पूर्व चे अध्यक्ष आणि शिरोळचे नगरसेवक  डॉ. अरविंद अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ.अरविंद माने यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना शासकीय परीक्षामुळे दहावीच्या गुणांमध्ये होणारी वाढ विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरू शकते, त्यामुळे अशा पद्धतीच्या विविध स्तरावर शासकीय चित्रकला स्पर्धा  पूर्व मार्गदर्शन शिबिर घेऊन विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची व कला गुणांची आवड निर्माण केली पाहिजे. असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यशाळेस भारतीय जनता पार्टीचे शिरोळ तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे,  जिल्हा परिषद कोल्हापूरचे कक्ष अधिकारी शिवाजी धुमाळ, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.हेरवाडे षडंग सोसायटी ऑफ आर्टचे संस्थापक अध्यक्ष शुभम माने , नगरसेवक श्रीवर्धन माने देशमुख माजी नगरसेवक विजय उर्फ दादासो कोळी शिरोळ शहर भाजपा अध्यक्ष संभाजी भोसले सामाजिक कार्यकर्ते बबन बन्ने, भाग्योदय ढवळे, ऋषिकेश माने, सैनिक माने ,संतोष खराडे, सहाय्यक शिक्षिका सौ.लता माने,आशिष सातपुते, भावना शहा, श्रुती पारसे , जीनत मुल्ला, ओमकार काळे, यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अँड अनिकेत भंडारे यांनी आभार व्यक्त केले. नगरसेवक डॉ अरविंद माने यांचे या कार्यशाळेस मोलाचे सहकार्य लाभले