जिद्द चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर यश गाठता येते: गणपतराव पाटील शिरोळ येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे जीवनगौरव व समाजभूषण पुरस्काराचे वितरण
शिरोळ : प्रतिनिधी :
जिद्द, चिकाटी, आणि मेहनत यांचा त्रिवेणी संगम झाल्यास यशाचे मंदिर गाठता येते हे पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्तीनी समाजाला दाखवून दिले आहे हा आदर्श भावी पिढीसाठी निश्चितच अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले
येथील टारे क्लब हाऊस शिरोळ येथे आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्यावतीने जीवनगौरव व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात गणपतराव पाटील बोलत होते अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते
गणपतराव पाटील पुढे म्हणाले पुरस्कार प्राप्त अशोक चौगुले लक्ष्मण भाट सूर्यकांत गाडगीळ या मान्यवरांनी खडतर प्रवास करीत उद्योग व्यवसायात उत्तुंग भरारी घेतली आहे याची पारख जेष्ठ नागरिक सेवा संघाने करून समाज जीवन उंचावण्याचा त्यांनी प्रयत्न केले आहेत हे काम निश्चितच वाखाणण्या जोगे आहे असे गौरवोदगार काढले यावेळी माजी आमदार उल्हास पाटील नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिक सेवा संघाने एकत्र येऊन समाजातील चांगुलपणा शोधून पुरस्कार देण्याचा जो उपक्रम राबवला आहे तो खरोखर स्तुत आहे तेव्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा आणि पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्तींचा समाजाने आदर्श घेणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले सत्कारमूर्ती लक्ष्मण भाट यांचे सुपुत्र विठ्ठल भाट म्हणाले आमच्या आई-वडिलांनी अपार कष्ट करून मुलांना सुशिक्षित करून समाजाच्या पटलावर जगण्यास शिकवले तर सूर्यकांत गाडगीळ म्हणाले शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहे त्यामुळे सुखाचे दिवस जगता येत आहेत अशोक चौगुले यांनी आई वडिलांचा आदर्श घेऊन उत्तमशेती केली आहे एकरी शंभर ते सव्वाशे उसाचे टनेज काढून शेतीत प्रगती साधली आहे नामवंत खताच्या कंपन्यांची डीलरशिप घेऊन शेतकऱ्यांना माफक दरात खते बियाणे औषधे देऊन शेतीमध्ये क्रांती करीत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले
प्रारंभी स्वागत प्रास्ताविक जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष आत्माराम मुळीक यांनी केले यावेळी माजी सरपंच दरगू गावडे राजाराम राजाराम कुंभार पंडित काळे हनुमंत कोळी प्रकाश पाटील शोभा चौगुले शारदा भाट सदाभाऊ बेंद्रे शिवाजी पाटील के एम भोसले आभार सतीश आडगुळे यांनी मांडले तर पै. नंदकुमार सुतार यांनी सूत्रसंचलन खुमासदार पद्धतीने करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले