लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या शिरोळ तहसीलवर मातंग एल्गार मोर्चा
शिरोळ : प्रतिनिधी :
दलित, अल्पसंख्याक, मातंग जातीचे म्हणून डॉ. आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासह विविध मागणीसाठी आम्ही मातंग या संघटनेच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयावर मातंग एल्गार मोर्चा काढण्यात आला
शिरोळ तालुक्यातील मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने शिरोळमधील शिवाजी चौकात एकत्र आले तेथून विविध घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरून शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर त्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये मातंग समाजाच्या विविध मागण्या संदर्भात उहापोह करीत शासनाने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली त्यानंतर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून शब्बीर मोमीन यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले मोमीन यांनी आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवू असे आश्वासन दिले
तहसील कार्यालयास दिलेल्या निवेदनात दलित अल्पसंख्यांक मातंग जातीचे म्हणून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे अनुसूचित जातीमधील आरक्षणाचे अ, ब, क, ड वर्गीकरण करून मातंग समाजाचे हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे.मातंग समाजाला जगण्याचे कोणतेच साधन उपलब्ध नाही म्हणून या समाजाला शेतजमिन मिळाली पाहिजे.आयोगाने राज्यातील प्रत्येक तालुका, गाव येथून समाजाच्या मागणीचा विचार करता शासनाला शिफारस करून सुध्दा अंमलबजावणी झालेली नाही तरी वस्ताद लहुजी साळवे आयोगाची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे.
शिरोळ तालुक्यामध्ये आण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा व भव्य दिव्य स्मारक झाले पाहिजे.अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९७९ (अॅट्रॉसिटी) या कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे.या प्रमुख मागण्यासह इतर २० मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत
या मोर्चात आम्ही मातंग समितीचे निमंत्रक दिगंबर सकट सोयोजक अरुण कांबळे (तात्या) ,श्रीपती सावंत ( सर ), शाहिर आवळे, खंडोबा भोरे, बाळासो गायकवाड,संदिप बिरणगे, श्रीनिवास आवळे, अनिल लोंढे, सुनिल कांबळे, उमेश आवळे . बाबूराव ऐवळे, सुधीर आदमाने , शशिकांत घाटगे, भुपाल कनवाडे, बबलु तिवडे , विशाल कांबळे, नितिन वायदंडे, सागर बिरा , प्रदिप लोंढे, प्रशांत आवळे, अँड ममतेश आवळे, डॉ . रविकांत जगताप , दगडु माने, यांच्यासह मातंग बांधव मोठ्या संखेने सहभागी झाले होते .