Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

घोसरवाड आयुष्यवर्धिनी केंद्राचे काम उत्कृष्ट -डॉ. वीणा पाटील



दत्तवाड -  घोसरवाड ता. शिरोळ येथील आयुष्य आरोग्यवर्धिनी केंद्राला सहाय्यक संचालक आयुष्य पुणे डॉ. विना पाटील, अंजली कांबळे, तथा जिल्हा आयुष्य अधिकारी डॉ.सुशात रेवडेकर यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी ग्रामीण भागातील घोसरवाड आयुष्यवर्धिनी केंद्राचे काम उत्कृष्ट असून गेल्या दोन वर्षात बाळंतपण, महिलांचे विविध आजार, साथीचे आजार, लसीकरण, आयुष्यमान भव  मेळावे,योग ध्यान शिबीरे,अंगणवाडी व शाळा मधील आरोग्य तपासणी व त्यांना योग्य जीवनमान विषयी मार्गदर्शन, मानसिक आरोग्य तपासणी व सल्ला, आयुर्वेदिक औषधी वनस्पती माहिती व उपचार बद्दल जनजागृती याबाबत चांगले काम झाले आहे. घोसरवाड गावातील रुग्णांना या आयुष्य केंद्राचा लाभ होत आहे .   असा अभिप्राय डॉ. विना पाटील यांनी दिला. प्रथम स्वागत डॉ. भूषण यमाटे यांनी केले.
   यावेळी आरोग्य सेवक विष्णू पोतदार,  परिचारिका फरनाज सनदी,मेरी कानिटकर,   विष्णू निर्मळे, प्रिया लोकरे. आशा स्वयंसेविका यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.