अमरसिंह पाटील यांनी विकास कामातून कर्तुत्व सिद्ध केले : आमदार सतेज उर्फ बंटी पाटील शिरोळमध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण व उद्घाटन समारंभ उत्साहात
शिरोळ : प्रतिनिधी
नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी शिरोळ नगरीमध्ये प्रभागांमधील घराघरापर्यंत विकासाची गंगा नेली आहे. त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे . गट - तट न पाहता सर्वांना सोबत घेऊन शहराचा अधिक विकास कसा होईल हेच स्वप्न उराशी बाळगून त्यांनी राजकारण आणि विकास यामध्ये गलत केलेली नाही विकासातून कर्तृत्व जन्माला येते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले असून विकासाच्या मागे धावणाऱ्या अमरसिंह पाटलांना आमचा सदैव पाठिंबा राहील असे मत माजी मंत्री व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केले.
येथील नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना व आमदार डॉ राजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा माजी पालकमंत्री व आम सतेज पाटील , आमदार डॉ.राजेंद्र पाटील- यड्रावकर , दत चे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला . यावेळी अध्यक्षपदावरून आमदार पाटील यड्रावकर बोलत होते . प्रारंभी स्वागत शिवाजी पुजारी यांनी केले . प्रास्ताविक नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी गेल्या पाच वर्षाच्या विकास कामाचा लेखाजोखा मांडून जिल्ह्यातील मंत्री , पालकमंत्री व आमदार यांनी विकास कामात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार मानले
यावेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले,नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांची राजकीय सामाजिक वाटचाल पाहिली तर त्यांना खऱ्या अर्थाने विकास कामातील विराट कोहली म्हटले पाहिजे . सर्व पक्षाच्या नेते मंडळाच्या कडे जाऊन नगरीच्या विकासाची फाईल त्यांच्यासमोर ठेवून निधी मिळवून आणणारा आणि धडपडणारा कार्यकर्ता म्हणजे अमरसिंह पाटील हे होय .
माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी शिरोळच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या पाच वर्षांमध्ये निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्यापेक्षा अधिक विकास कामे करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. कर्तुत्वाने माणूस मोठा होतो हे त्यांनी दाखवले आहे
यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले , अमरसिंह पाटलांच्याकडून एक चांगला गुण शिकायला मिळतो की विकासासाठी सर्व पक्षीय नेते मंडळींच्याकडे जाऊन निधी कसा खेचून आणायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे हा गुण निश्चितच मला भावलेला आहे सर्वांना सोबत घेऊन नगरीचा विकास केलाय या विकासाला तोड नाही असा असे सांगून त्यांनी भविष्यातील त्यांच्या हातून अधिकाधिक विकास कामे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करून केली .
या कार्यक्रमास मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव , उपनगराध्यक्षा करुणा कांबळे , अर्जुन काळे ,शिवाजीराव माने - देशमुख , प्रताप उर्फ बाबा पाटील यासह पै प्रकाश गावडे , राजेंद्र चुडमुंगे, योगेश पुजारी ' तातोबा पाटील, , दयानंद जाधव , कविता भोसले, कमलाताई शिंदे , सुरेखा पुजारी , कुमुदिनी कांबळे, जयश्री धर्माधिकारी , विजय पाटील , अभिजीत पवार , तानाजी आलासे , एन वाय जाधव , अमर शिंदे , अण्णासाहेब गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आप्पासाहेब पुजारी सर यांनी आभार मानले .
दरम्यान शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ५५ लाख रुपयाच्या निधीतून धनगर समाज बांधवांसाठी बांधण्यात आलेले सामाजिक सभागृहाचे लोकार्पण व आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून २० लाख रुपये मंजूर झालेल्या भोजनगृह इमारतीची पायाभरणी समारंभ तसेच ३०- ५४ योजनेअंतर्गत ५० लाख रुपये मंजूर झालेल्या सोंडमळी रस्ता करणे कामाचे उद्घाटन व कोरवी समाज व वडर समाज स्मशानभुमी संरक्षक भिंत शेड बांधकामाचे लोकार्पण आणि लिंगायत समाज स्मशानभुमी आगर रोड रस्ता क्रॉक्रिटीकरण व पथ दिवे या कामाचा शुभारंभ मालवरांच्या हस्ते पार पडला .