हृदयस्पर्शी शिक्षक फौंडेशनच्या अध्यक्षपदी बाळासाहेब कोळी तर प्रसिद्धी प्रमुखपदी दिलीप शिरढोणे.
शिरोळ प्रतिनिधी :
शिरोळ शहरातील प्राथमिक शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही योगदान देण्याच्या उद्देश्याने स्थापन केलेल्या हृदयस्पर्शी शिक्षक फाउंडेशनला एक वर्ष पूर्ण झाले. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर फाउंडेशनची व्याप्ती वाढवून ती शिरोळ तालुका कार्यक्षेत्र करुन तालुक्यातील शिक्षकांना सभासद करून घेणे.तसेच फाउंडेशनची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी संस्थापक नामदेव सन्नके यांच्या अध्यक्षतेखाली दत्तनगर येथे बैठक संपन्न झाली.यांमध्ये पुढील कामकाजाची रूपरेषा ठरवून सविस्तर चर्चा करणेत आली.हृदयस्पर्शी शिक्षक फाउंडेशनमध्ये नवीन सभासद म्हणून दिलीप शिरढोणे,मेहबूब मुजावर,मनोज रणदिवे यांनी आपली नोंदणी करून सभासदत्व स्विकारले.
नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे -अध्यक्ष -बाळासाहेब कोळी,उपाध्यक्षा -संगीता घोरपडे,कार्यवाहक -शरद सुतार,सचिव -बाजीराव कोळी,खजिनदार -मौलाअली मुल्ला,सहखजिनदार -धनाजी आवळे,ऑडिटर- सुनिल कोळी,सहऑडिटर-संतोष ठोमके,प्रसिध्दी प्रमुख -दिलीप शिरढोणे,सहप्रसिध्दी प्रमुख -अजित कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना अध्यक्ष बाळासाहेब कोळी म्हणाले,सर्व सदस्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्वांचे हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो.अशीच साथसंगत,सहकार्य इथून पुढच्या काळातही मिळावे.तालुक्यातील शिक्षकांनी फौंडेशनचे सदस्य स्विकारुन प्रसार करण्यात योगदान देण्याचे आवाहन केले.
यावेळी शरद सुतार,संपत कोळी,सुनिल कोळी,मेहबूब मुजावर,नूरमहंमद मुल्ला,सुनंदा पाटील,नीता चव्हाण यांची मनोगते झाली.
याप्रसंगी फौंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.