Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद येथील 250 एकर जमीन सुधारणा कामाचा सर्व्हे शुभारंभ

शिरोळ (प्रतिनिधी) :


   शेती आणि शेतकरी जिवंत राहिला तरच जग चालेल. यासाठी स्वच्छ मनाने शेती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाणी आणि खताचा अतिवापर झाल्यामुळे जमिनी खराब झाल्या आहेत. जमिनीतील क्षार आणि पाणी बाहेर काढणे आवश्यक आहे. यासाठी सच्छिद्र निचरा प्रणाली उपयुक्त आहे. औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद येथील शेतकऱ्यांनी क्षारपडमुक्त जमिनीसाठी सुरू केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत, असे प्रतिपादन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.

  विजयादशमी, दसऱ्याचे औचित्य साधून औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद येथील 250 एकर जमीन सुधारणा कामाचा सर्व्हे शुभारंभ  श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या  हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. कवठेगुलंद येथे शेतकरी सहकारी क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था मर्यादित जाधव मळा, कवठे गुलंदच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

    गणपतराव पाटील पुढे म्हणाले, शेत जमिनी सुधारण्यासाठी जयसिंगपूर उदगाव बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करीत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची कारखान्याची भूमिका कायम राहिली आहे. कारखान्याची गाळप क्षमताही वाढवली असून त्याचाही फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी दत्त कारखाना आणि दत्त उद्योग समूह खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहिल. 

 मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी दत्त कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या क्षारपड मुक्तीच्या दत्त पॅटर्नला केंद्र सरकारचे कॉपीराईट मिळाले आहे. या पॅटर्नमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आले असून या चळवळीमुळे आता हमरस्ता तयार झाला असल्याचे सांगितले. राजू रावण, जयपाल कुंभोजे व ऋषिराज शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक अविनाश कदम यांनी तर आभार बाबगोंडा पाटील यांनी मानले.

       प्रारंभी स्व. डॉ. सा.रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक भैय्यासाहेब पाटील, कॉन्टॅक्टर कीर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे, महावीर कुंभोजे, रावसो पाटील, धोंडीराम चंदुरे, गोविंद पट्टेकरी, अशोक पाटील, प्रकाश जाधव, रावसाहेब गडगंले, अमोल महाडिक, शिवा कागले, राजाराम रावण, महावीर कुंभोजे, निरंजन जाधव, अनिल नारे, बंडू पाटील, सुधीर पाटील, बबन जाधव, जगन्नाथ कदम, मानसिंग शिंदे, डॉ. संजय पाटील, भुपाल कांबळे गुरुजी, नंजापा भेंडवडे, पिलो भेंडवडे, उमेश राजमाने यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.