Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

ऐतिहासिक जय भवानी तोफेच्या सलामीने शिरोळात सिमोल्लंघन सोहळा उत्साहात

शिरोळ : 


प्रतिनिधी : विजयादशमी दसरा निमित्ताने  शिरोळमधील ऐतिहासिक जय भवानी तोफेच्या पाच सलामीने शाही सीमोल्लंघन सोहळा अमाप उत्साहात पार पडला

शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने विजयादशमी दसऱ्यानिमित्त प्रत्येक वर्षी येथील दसरा चौक आणि श्री बुवाफण महाराज मंदिर परिसरात सीमोल्लंघन सोहळा आयोजित केला जातो नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यासह मानकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी तक्त येथे छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या गादीस मानवंदना देऊन व पालखी पूजन करून या दसरा महोत्सवाची सुरुवात झाली उपस्थित मान्यवरांचे हस्ते ऐतिहासिक अशा जय भवानी तोफेचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला गावातील सर्व देवतांची पालखी आणि पारंपारिक वाद्याच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून सोनं लुटण्यासाठी मिरवणूक दसरा चौकाकडे मार्गस्थ झाली दसरा चौकात मिरवणूक आल्यानंतर त्या ठिकाणी जय भवानी तोफेच्या तीन सलामी देऊन व आपटा पूजन करून सीमोल्लंघन सोहळा पार पडला यानंतर एकमेकांना आपट्याची पानं देत सोनं घ्या सोन्यासारखे रहा अशा शुभेच्छा देण्यात आल्या

नगरसेवक श्रीवर्धन माने देशमुख शिरोळ शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील आणि युवा सामाजिक कार्यकर्ते बुधाजी चुडमुंगे यांच्या हस्ते या ठिकाणी जय भवानी तोफेची सलामी देण्यात आली येथील दसरा उत्सव पार पडल्यानंतर पुन्हा मिरवणूक श्री बुवाफण महाराज मंदिर परिसराकडे मार्गस्थ झाली

श्री बुवाफण महाराज मंदिर परिसरात मिरवणूक आल्यानंतर या ठिकाणी जय भवानी तोफेच्या दोन सलामी देण्यात आल्या मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव आणि पाटील घराण्याचे मानकरी नागेश पाटील अजिंक्य पाटील धैर्यशील पाटील यांच्या हस्ते जय भवानी तोफेची सलामी देण्यात आली यानंतर या ठिकाणी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी सीमोल्लंघन केले यानंतर एकमेकांना आपट्याची पाने देत सोनं घ्या सोन्यासारखं रहा अशा शुभेच्छा देऊन आलिंगन दिले

यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील उपनगराध्यक्षा सौ करुणा कांबळे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव प्रशासन अधिकारी लक्ष्मण लोंढे कार्यालयीन निरीक्षक संदीप चूडमुंगे दलितमित्र डॉ अशोकराव माने शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी सरपंच शिवायराव माने देशमुख अर्जुन काळे माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील नगरसेवक पै प्रकाश गावडे राजेंद्र माने योगेश पुजारी तातोबा पाटील डॉ अरविंद माने श्रीवर्धन माने देशमुख दयानंद जाधव रावसाहेब पाटील मलिकवाडे अण्णासाहेब माने गावडे एन वाय जाधव पदमसिंह पाटील नगरसेविका कमलाबाई शिंदे सुरेखा पुजारी कुमुदिनी कांबळे जयश्री धर्माधिकारी जनार्दन कांबळे अमरसिंह शिंदे सुरज कांबळे अण्णासो पुजारी प्रतीक धर्माधिकारी सचिन माळी सनीसिंग पाटील यांच्यासह वीर शहरातील मान्यवर मानकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते